जात प्रमाणपत्र पडताळणी विशेष मोहिमेंतर्गत कार्यशाळेचे आयोजन
Osmanabad news :-
उस्मानाबाद,दि.7(जिमाका):- स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व राष्ट्रपीता महात्मा जोतिराव फुले यांची जंयती आणि महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जंयती यांचे औचित्य साधून सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातील राज्यामध्ये "सामाजिक समता सप्ताह"निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
त्याचाच एक भाग म्हणून आज 7 एप्रिल रोजी श्रीपतराव भोसले ज्यु कॉलेज उस्मानाबाद येथे कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेस संशोधन अधिकारी तथा सदस्य सचिव एस.टी.नाईकवाडी यांनी बारावीमधील विद्यार्थ्यांना जात पडताळणीचे ऑनलाईन अर्ज भरण्याबाबत मार्गदर्शन केले. त्याप्रसंगी कॉलेजचे प्राचार्य साहेबराव देशमुख,श्री घाडगे आणि बारावीचे विद्यार्थी उपस्थित होते.