झरेगाव येथे रुंद सरी वरंबा प्रशिक्षण व मार्गदर्शनास प्रतिसाद

0
झरेगाव येथे रुंद सरी वरंबा प्रशिक्षण व मार्गदर्शनास प्रतिसाद


उस्मानाबाद दि.१४ (प्रतिनिधी) - खरीप हंगाम जवळ येत असून त्यासाठी पुर्व तयारी करण्यात येत आहे. याचाच भाग म्हणून उस्मानाबाद तालुक्यातील झरेगाव येथे कृषी विभागाच्या माध्यमातून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर शेतकऱ्यांनी करावा यासाठी त्यांना तंत्रज्ञान कसे वापरावे ? याचे प्रात्यक्षिक करून दाखविण्यासह प्रशिक्षण व मार्गदर्शन करण्यात आले. यास शेतकऱ्यांचा भरभरून प्रतिसाद मिळाला.
खरीप हंगामात सोयाबीनची पेरणी रुंद सरी वरंबा म्हणजेच बीबीएफ पद्धतीने करावी. तसेच शेतकऱ्यांनी जास्तीचे उत्पादन घ्यावे यासाठी कृषी विभागाच्या माध्यमातून गावोगावी कार्यरत असलेल्या कृषी सहाय्यक यांच्या माध्यमातून या पध्दतीचा शेतकऱ्यांनी प्रभावीपणे वापर करावा यासाठी जनजागृती करण्यासाठी विशेष भर दिला असून प्रयत्न सुरू आहेत. उस्मानाबाद तालुका कृषी अधिकारी डी.आर. जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी सहाय्यक नितीन जाधव, कृषी पर्यवेक्षक एन.एन. पाटील यांनी तालुक्यातील झरेगाव येथे रुंद वरंबा सरी (बीबीएफ) प्रशिक्षण दरम्यान शेतकऱ्यांना समजेल अशा भाषेत मार्गदर्शन केले. तर या पद्धतीचा प्रत्यक्ष कशा पद्धतीने वापर करावा ? याचे प्रात्यक्षिक देखील त्यांनी प्रत्यक्षात यंत्राच्या सहाय्याने शेतीवर करून दाखवले. यावेळी शेतकरी चंद्रकांत सारफळे, गणेश तांबे, विकास सोनवणे, पोलिस पाटील राजेंद्र सोनवणे, प्रदीप तांबे, अरुण सारफळे, अमोल देशपांडे, पांडुरंग तांबे, सत्यवान माने, सुनील संकपाळ, शिवाजी सोनवणे, महेश तांबे, संतोष ढोकळे, विकास धर्मे, अनिकेत ढोकळे, हनुमंत सोनवणे, अरुण गुंड, सुदेश साबळे आदीसह इतर शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top