उस्मानाबाद जिल्ह्यात जुगार विरोधी पाच ठिकाणी कारवाई

0




उस्मानाबाद जिल्ह्यात जुगार विरोधी पाच ठिकाणी  कारवाई


Osmanabad news :


Osmanabad police :- 

जुगार विरोधी कारवाई दरम्यान उस्मानाबाद पोलीसांनी दि. 30 मे रोजी जिल्हाभरात छापे मारुन छाप्यातील जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन संबंधीत व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यांतर्गत संबंधीत पोलीस ठाण्यात खालील प्रमाणे 6 गुन्हे नोंदवले आहेत.

1) तामलवाडी पोलीसांनी दोन ठिकाणी छापे मारले असता अनिल काशीद हे तामलवाडी येथील पाण्याच्या टाकीजवळ कल्याण मटका जुगार साहित्यासह 570 ₹ रक्कम तर मसला (खु.) ता. तुळजापूर येथे सखाराम कोळी व विक्रम नाईकवाडी हे दोघे मिलन मटका जुगार साहित्यासह 460 ₹ रक्कम बाळगलेले असताना आढळले.

2) लोहारा पोलीसांना नळदुर्ग खय्युम शेख हे सास्तुर गावातील ग्रामपंचायत जवळ मेन बाजार मटका जुगार साहित्यासह 700 ₹ बाळगलेले असताना आढळले.

3) नळदुर्ग पोलीसांना स्वामीनाथ हळगोदे हे अणदुर येथील एका हॉटेलजवळ कल्याण मटका जुगार साहित्यासह 1,590 ₹ रक्कम बाळगलेले असताना आढळले.

4) भुम पोलीसांना प्रताप राउत हे भुम बस स्थानकामागील पानटपरीसमोर मिलन नाईट मटका जुगार साहित्यासह 1,140 ₹ बाळगलेले असताना आढळले.

5) कळंब पोलीसांना अंगद बारकुल, राहुल परदेशी, यश जाधव हे तीघे कळंब येथील ढोकी रस्त्यालगत ऑनलाईन सट्टा जुगार साहित्यासह तीन भ्रमणध्वनी व रक्कम असा एकुण 32,000 ₹ चा माल बाळगलेले आढळले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top