ऑडिटर्स कॉसील अ‍ॅन्ड वेल्फेअर असोसीएशनच्या वतीने अनिल पाटील यांना उत्कृष्ट लेखा परिक्षक पुरस्कार

0

उस्मानाबाद - ऑडिटर्स कॉसील अ‍ॅन्ड वेल्फेअर असोसीएशनच्या वतीने यावर्षीपासून राज्यातील उत्कृष्ट लेखा परीक्षक पुरस्काराचे वितरण करण्यात येत आहे. यावर्षीचा जिल्ह्यातून प्रथम, विभागातून प्रथम व राज्यातून तिसरा पुरस्कार उस्मानाबाद येथील अनिल किसनराव पाटील यांना महाराष्ट्र राज्याचे सहकार आयुक्त व निबंधक अनिल कवडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

ऑडीटर कौन्सिलच्या वतीने कराड येथे नुकत्याच पार पडलेल्य्या अधिवेशन व कार्यशाळेस महाराष्ट्र राज्याचे सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील, लेखा समीतीचे अध्यक्ष शहाजी क्षीरसागर, सहकारी संस्थांच्या लेखापरीक्षण विभागाचे सहनिबंधक तानाजी कवडे, निवृत्त सहकार अप्पर आयुक्त एस. बी. पाटील, कोल्हापूर विभागीय सहनिबंधक अरुण काकडे, सातारा येथील जिल्हा उपनिबंधक मनोहर माळी उपनिबंधक संदीप जाधव आदी मान्यवरांच्या उपस्थीतीत अनिल पाटील यांना सन्मानीत करण्यात आले.

या कार्यक्रमासाठी ऑडीटर कौन्सिल अ‍ॅन्ड वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष रामदास शिके,उपाध्यक्ष आबासाहेब देशमुख, सचिव उमेश देवकर, सहसचिव दत्तात्रय पवार खजिनदार संदिप नगरकर तसेच विश्वस्त संजय घोलप, श्रीकांत चौगुले व संपत शिंदे यांनी या अधिवेशनाचे नियोजनबद्ध कार्य पार पाडले. या कार्यक्रमासाठी संपुर्ण महाराष्ट्रातील लेखापरिक्षकांनी सहभाग नोंदविला. उस्मानाबाद जिल्याचा मान वाढविल्यामुळे अनिल पाटील यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top