धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंतीच्या पूर्वसंध्येस वडगाव (सि) मध्ये फडकला महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्वाधिक 125 फूट उंचीचा भगवा ध्वज
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती सोहळ्याचे औचित्य साधून उस्मानाबाद तालुक्यातील वडगाव (सिद्धेश्वर) येथे महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्वाधिक 125 फूट उंचीचा भगवा ध्वज फडकविण्यात आला. खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आमदार कैलास घाडगे पाटील व उस्मानाबादचे माजी नगराध्यक्ष मकरंद उर्फ नंदुभैय्या राजेनिंबाळकर यांच्या हस्ते आज (दि. 13) ध्वजारोहण करण्यात आले.
उस्मानाबाद तालुक्यातील वडगाव (सि.) येथील अंकुश काका मोरे युवा प्रतिष्ठाण व सिद्धेश्वर स्पोर्ट्स क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने या भव्यदिव्य ध्वजाची उभारणी करण्यात आली आहे. युवानेते अंकुश मोरे व पंचायत समितीचे सदस्य गजेंद्र जाधव यांच्या संकल्पनेतून हा ध्वज साकारण्यात आला आहे. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्ताने आज भव्य रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले होते.
तत्पूर्वी त्याचबरोबर महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्वात उंच 125 फूट उंचीच्या भगवा ध्वजाचे ध्वजारोहण खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार कैलास पाटील, माजी नगराध्यक्ष मकरंद उर्फ नंदूभैय्या राजेनिंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास माजी नगरसेवक सोमनाथ गुरव, युवा सेनेचे रवी वाघमारे, बाळासाहेब काकडे, माजी शहरप्रमुख प्रवीण कोकाटे, माजी सभापती बालाजी गुंजाळ (भूम), देवळालीचे सरपंच समाधान सानप, हनुमंत देवकते, सहायक अभियंता श्री.मगर, आदींची प्रमुख उपस्थिती होती.
प्रारंभी अंकुश मोरे, बळीराम कांबळे, जयराम मोरे, गडचिरोलीचे तहसिलदार लक्ष्मीकांत घाटे, सुनील पांढरे, आण्णा पांढरे, बाळासाहेब मोरे, पोपट माळी, विश्वजित गुरव यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. त्यानंतर भव्यदिव्य ध्वजाचे ध्वजारोहण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जय भवानी जय शिवराय, छत्रपती संभाजी महाराज की जय अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.
14 मे रोजी वडगाव येथील छत्रपती संभाजी महाराज चौकामध्ये संभाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व 15 मे रोजी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची प्रतिमेची गावातून भव्यदिव्य मिरवणूक काढण्यात येणार असल्याचे अंकुश मोरे व गजेंद्र जाधव यांनी सांगितले.
जयंती उत्सवासाठी समितीचे अध्यक्ष बाळासाहेब मोरे, उपाध्यक्ष सुरज वाडकर, प्रकाश मोरे, जयराम मोरे, सरपंच बळीराम कांबळे, सुदर्शन मोरे, सदस्य धीरजकुमार मोरे, पोपट मोरे, चंद्रकांत मोरे, विश्वजीत गुरव, अण्णा पांढरे, सुनील पांढरे, रणजीत मोरे, प्रमोद चादरे, अभिजीत मोरे, महेश मोरे, अंकुश काका मोरे युवा प्रतिष्ठान, सिद्धेश्वर स्पोर्ट्स क्लब, संभाजी महाराज जयंती उत्सव समितीचे पदाधिकारी आदी परिश्रम घेत आहेत.