१५ पोलीस कॉन्स्टेबल यांना अनुकंपा तत्त्वावर नियुक्ती प्रदान

0



१५ पोलीस कॉन्स्टेबल यांना अनुकंपा तत्त्वावर नियुक्ती प्रदान

Osmanabad news :- 

       पोलीस दलात कर्तव्यावर असताना मयत झालेल्या पोलीस अंमलदाराच्या एका वारसास अनुकंपा तत्वावर पोलीस कॉन्स्टेबल या हुद्द्यावर नियुक्ती दिली जाते. उस्मानाबाद जिल्हा पोलीस दलात कर्तव्यावर असताना सन- 2014 ते 2021 दरम्यान मयत झालेल्या 15 पोलीस अंमलदारांच्या 14 पुरुष व 1 महिला वारसदारांना आज दि. 18.05.2022 रोजी मा. पोलीस अक्षीक्षक श्री. नवनित काँवत यांच्या हस्ते पोलीस कॉन्स्टेबल हुद्द्याची नियुक्तीपत्रे देउन पोलीस मुख्यालयात कर्तव्यावर रुजू करुन घेण्यात आले आहे. या प्रसंगी राखीव पोलीस निरीक्षक श्री. अरविंद दुबे, सहायक पोलीस निरीक्षक- श्री विनोद चौधरी, कार्यालय अधीक्षक श्री. नरसिंह कासेवाड, मुख्य लिपीक श्री प्रशांत देसाई हजर होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top