उस्मानाबाद जिल्ह्यात अवैध मद्य विरोधी कारवाई
Osmanabad news :-
उस्मानाबाद ;- अवैध मद्य विरोधी कारवाई दरम्यान उस्मानाबाद पोलीसांनी दि. 23 मे रोजी जिल्हाभरात छापे मारुन छाप्यातील अवैध मद्य जप्त करुन संबंधीत व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायद्यांतर्गत संबंधीत पोलीस ठाण्यात खालील प्रमाणे 12 गुन्हे नोंदवले आहेत.
1) शिराढोन पोलीसांना मंगरुळ येथे बालीबाइ पवार या 6 बाटल्या देशी दारु तर वाठवड- मुरुड रस्त्यालगत आनंद वाघचौरे हे 20 लि. हातभट्टी दारु बाळगलेले असताना आढळले.
2) ढोकी पोलीसांना दाउदपूर शिवारात सतिष थोरात हे 840 ₹ किंमतीच्या देशी दारच्या बाटल्या, पळसप- सारोळा रस्त्यावरील पुलाजवळ जालींदर शिंदे हे अंदाजे 1,200 ₹ किंमीची हातभट्टी दारु तर गोपाळवाडी येथे दशरथ देडे हे आपल्या घरासमोर 5,100 ₹ किंमतीची हातभट्टी दारु बाळगलेले असताना आढळले.
3) कळंब पोलीसांना कळंब येथील पर्यायी मार्गालगत भागुबाई पवार या 2,000 ₹ किंमतीची हातभट्टी दारु तर कन्हेरवाडी येथे संगिता काळे या आपल्या घरासमोर 2,500 ₹ किंमतीची हातभट्टी दारु बाळगलेल्या असताना आढळल्या.
4) येरमाळा पोलीसांना बरमाचीवाडी येथे हिराबाई काळे या आपल्या घरासमोर गावठी हातभट्टी दारु निर्मीतीचा गुळ- पाणी मिश्रीत 150 लि. द्रव पदार्थ व 9 लि. हातभट्टी दारु बाळगलेल्या असताना आढळल्या.
5) वाशी पोलीसांना वाशी महावितरण कार्यालयाजवळ शशिकला काळे या 11,480 ₹ किंमतीची हातभट्टी दारु बाळगलेल्या असताना आढळल्या.
6) उमरगा पोलीसांना कराळी शिवारात श्रीकांत मंडले हे 1,100 ₹ किंमतीची हातभट्टी दारु बाळगलेले असताना आढळले.
7) राजेबोरगाव फाटा येथील रस्तयाने अशोक घाडगे, रा. समुद्रवाणी हे युनिकॉर्न मोटारसायकल क्र. एम.एच. 25 एयू 0012 वरुन चार खोक्यांत एकुण 192 बाटल्या देशी दारु (किं.अं.11,520 ₹) अवैधरित्या वाहून नेत असताना बेंबळी पोलीसांना आढळले.
8) स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जागजी तांडा येथे छापा टाकला असता संतोष आडे, विलास आडे, उत्तम राठोड, गोपीनाथ आडे, बालाजी आडे, विलास जाधव, भाऊराव जाधव, माणिक राठोड, केशव राठोड हे सर्व आज दि. 24 मे रोजी तांडा परिसरात गावठी हातभट्टी दारु निर्मीतीचा गुळ- पाणी मिश्रीत 6,740 लि. द्रव पदार्थ हा लोखंडी- प्लास्टीक असे 31 पिंपे, 6 कॅन व 16 घागरींत बाळगलेले व हा द्रव उपसण्यासाठी वेगवेगळ्या कंपनीच्या 12 विद्युत मोटारी असा एकूण 4,62,400 ₹ चा माल बाळगलेले असताना पथकास आढळले.
(जागजी तांडा व समुद्रवाणी येथील मद्य विरोधी छाप्याची छायाचित्रे.)