राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत दृष्टीदान दिन सप्ताहाचा उद्घाटन
Osmanabad news :-
उस्मानाबाद,दि.13(जिमाका):- येथील जिल्हा रुग्णालयातील नेत्रविभागात डॉ. रामचंद्र लक्ष्मण भालचंद्र यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दि. 10 ते 16 जून 2022 या कालावधीत राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत दृष्टीदान सप्ताहाचे उद़घाटन करण्यात आले.
या वेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.संजय राठोड आणि जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. धनंजय पाटील, स्त्री रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ.स्मिता गवळी, डॉ. ईस्माईल मुल्ला, डॉ.सुधीर सोनटक्के, डॉ.संजय सोनटक्के, नेत्र शल्यचिकित्सक डॉ. मुस्तफा पल्ला, डॉ. महेश पाटील, डॉ. विरभद्र कोटलवाड, डॉ. ज्योती कानडे तसेच अधिसेविका सुमित्रा गोरे, नेत्रचिकित्सा अधिकारी बाळासाहेब घाडगे, रामराजे बिडवे, जिल्हा रुग्णालयातील विविध विभागाच्या सर्व वॉर्ड इन्चार्ज आणि अधिपरीचारिका, नेत्रविभागाच्या वॉर्ड इन्चार्ज वहिदा शेख, सर्व नेत्रविभागातील अधिपरिचारिका तसेच कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.पाटील यांनी उपस्थित सर्वांना डॉ.भालचंद्र यांनी केलेल्या अंधत्व निर्मुलनाच्या केलेल्या कार्याला उद्देशून या सप्ताहाच्या कालावधीमध्ये नेत्रदान करण्याविषयी जनजागृ
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात नेत्र शल्यचिकित्सक डॉ.महेश पाटील यांनी डॉ.भालचंद्र यांचे सामाजिक भावनेतून आणि कुठलीही आधुनिक सोई सुविधा नसताना अंधत्व निर्मुलनाचे कार्य करुन हजारो लोकांना दृष्टी प्राप्त करुन देऊन त्यांच्या दृष्टीदानाच्या कार्याला उजाळा दिला. तसेच मरणोत्तर नेत्रदानाबाबत माहिती देऊन सर्वांना नेत्रदानचे संमतीपत्र भरुन देण्याबाबत आवाहन केले.
दरम्यान,2021-22 आणि 2022-23 या कालावधीमध्ये जिल्हा रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान आणि अपघाताने मृत्यू पावलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांनी त्यांच्या मरणोत्
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार प्रदर्शन श्री संतोष पोतदार यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता नेत्रविभागातील सर्व अधिकारी,नर्सिंग स्टॉफ आणि वर्ग-४ कर्मचा-यांनी परिश्रम घेतले.