प्रहार संघटनेच्या वतीने तीन चाकी सायकल व स्वावलंबन कार्ड चे वाटप
Osmanabad : प्रहार अपंग क्रांती आंदोलन उस्मानाबाद च्या वतीने राज्यमंत्री तथा राज्यातील दिव्यांग व्यक्तीचे आधरस्थान बच्चू भाऊ कडू यांच्या वाढदिवसानिमित्त दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबन कार्ड वाटप करण्यात आले एकूण 164 व्यक्तींना सस्वावलंबन कार्ड वाटप करण्यात आले उस्मानाबाद तालुक्यातील विविध गावातील दिव्यांग बांधवाना हे कार्ड मोफत वाटप करण्यात आले,सदरील कार्यक्रमाचे अध्यक्ष उस्मानाबाद जिल्ह्याचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर,तर उस्मानाबाद कळंब मतदार विधांसाभ मतदारसंघाचे कैलास दादा पाटील,उस्मानाबाद माझी नगराध्यक्ष नंदू भैया राजेनिंबाळकर,काँग्रेस पक्षाचे उपजिल्हाध्यक्ष प्रशांत पाटील,काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती ,स्वावलंबन कार्ड हे दिव्यांग व्यक्ती साठी अतिशय उपयोगी ओळखपत्र असून सर्व कामासाठी एकच कार्ड असून यामुळे प्रत्येक विभागात दिव्यांग व्यक्तीची होणारी हेळसांड यामुळे थांबणार आहे, या कार्यक्रमामध्ये दिव्यांग व्यक्ती करिता तीनचाकी सायकल चे वितरण करण्यात आले संघटनेच्या वतीने 4 दिव्यांग लाभार्थ्यांना या सायकलीचे वाटप करण्यात आले,यावेळी दिव्यांग बांधवांच्या चेहऱ्यावरील आनंद हा बघण्यासारखा होता ,गरजू दिव्यांग व्यक्तींना तीन चाकी सायकल दिल्यामुळे या दिव्यांग बांधवाना समाजात मुक्त पणे वावरता येणार आहे असे मत मान्यवरांनी व्यक्त केले...
अध्यक्षीय भाषणात आमचा मित्र मयुर स्वतः दिव्यांग असून दिव्यांग व्यक्तिकरिता इतके चांगले कार्य करत आहे हे पाहून कौतुक वाटत ,राज्यात बच्चू भाऊ ज्या प्रमाणे दिव्यांग व्यक्तीसाठी कार्य करतात त्याच पद्धतीने जिल्ह्यात मयुर करत आहेत तरी आज स्वावलंबन कार्ड वाटप केल्यामुळे दिव्यांग बांधवांची फरफट थांबवली आहे या कार्याच मी उपस्थित असलेल्या मान्यवरांच्या वतीने त्याच कौतुक आणि अभिनंदन करतो असे उदगार काढले
सदरील कार्यक्रमासाठी प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष मयुर काकडे ,शहराध्यक्ष जमीर शेख,जिल्हासघटक बाळासाहेब कसबे सर,उपजिल्हाध्यक्ष नवनाथ मोहिते,जिल्हाउपाध्यक्ष बाळासाहेब पाटील,दत्ता पवार,जिल्हासचिव महादेव चोपदार,उपाध्यक्ष महेश माळी,बाबभोईटे,गिरीश वैकुंटे,राजेश भिसे,संजय शिंदे, शिवकुमार माने,रमेश सुतार,तुकाराम गवार,सबदार शेख,बप्पा काशीद,राजेंद्र देशमुख यांनी घेतले
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कसबे सर यांनी तर समारोप जमीर शेख यांनी केला