उस्मानाबाद जिल्हा परिषदेत शिवस्वराज्य दिन उत्साहात

0


उस्मानाबाद जिल्हा परिषदेत शिवस्वराज्य दिन उत्साहात

                 Osmanabad news :-                                  

          उस्मानाबाद, दि06(जिमाका):- उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या प्रांगणातील यशवंतराव चव्हाण सभागृहासमोर शिवशक राजदंड स्वराज्य गुढी उभारुन शिवस्वराज्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. पंधरा फूट उंचीच्या लाकडी बांबूस सुवर्ण आणि लाल कापडाची गुंडाळी करण्यात आली होती. सहा फूट लांब आणि तीन फूट रुंदीचा भगवा जरी पताकासह असणारा ध्वज हा शिवरायांच्या जिरेटोप, सुवर्णहोन, जगदंब तलवार, शिवमुद्रा आणि वाघनखे या पंच शुभ चिन्हांनी सजवला होता.

            जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांनी प्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करुन पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर शिवशक राजदंड स्वराज्य गुढीचे पूजन करुन अभिवादन करण्यात आले.शिवशक राजदंड स्वराज्य गुढीचे पूजन केल्यानंतर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेचे केंद्रप्रमुख श्री.गिरी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी “ जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा” या महाराष्ट्र गीताचे सादरीकरण केले. तर राष्ट्रगीताने या कार्यक्रमाची सांगता झाली.

            यावेळी जि.प.चे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विलास जाधव, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालिका श्रीमती शिंदे, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुर्यकांत भुजबळ, पंचायत समिती विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी गोडभरले, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता (ल.पा.) नितीन भोसले, जिल्हा जलसंधारण अधिकारी सी.आर.राऊळ आणि जिल्हा परिषद तसेच इतर विभागातील प्रमुख अधिकारी-कर्मचारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top