तुळजापूरच्या युवा शेतकऱ्याने काढले ऐन उन्हाळ्यात फुल शेतीच्या माध्यमातून ५ लाखांचे उत्पन्न !

0

तुळजापूरच्या युवा शेतकऱ्याने काढले ऐन उन्हाळ्यात फुल शेतीच्या माध्यमातून ५ लाखांचे उत्पन्न !

तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथील श्री.दादाराव पाटील या युवा शेतकऱ्याने फुलांच्या शेतीचा एक नवा प्रयोग केला आहे. अवघ्या ८० गुंठे क्षेत्रात त्यांनी झेंडूच्या फुलांची लागवड केली. पाण्याच्या योग्य व्यवस्थापनामुळे झेंडूच्या शेतीतून ३ महिन्यातच तब्बल ५ लाखांचे उत्पन्न त्यांना मिळाले.

कडक उन्हाळ्यात भूमिगत ठिबक सिंचनाच्या माध्यमातून १४,००० रोपांचे संगोपन केले व ६५,००० भांडवल गुंतवणूक करून मोठ्या प्रमाणात नफा मिळवला.

त्यांच्या या यशाचे श्रेय ते आई वडिलांना देतात. उत्कृष्ट नियोजन, फुल तोडणी आणि पाण्याचे नियोजनासाठी त्यांचे वडील श्री.सुरेश पाटील, आई सौ.चित्ररेखा पाटील यांचेही मोठे मार्गदर्शन आणि सहकार्य प्राप्त झाल्याचे ते सांगतात.

शेतीमध्ये होणारे नवनवीन प्रयोग आणि शेतीची आधुनिकतेकडे होणारी वाटचाल अत्यंत कौतुकास्पद व समाधानकारक आहे. नवनवीन प्रयोग करत युवा पिढीही शेतीकडे वळत यशस्वी होत आहे. इतर शेतकऱ्यांनीही यातून प्रेरणा घेऊन कमीत कमी खर्चात अधिकाधिक उत्पादन घेण्याचा प्रयोग आपल्या शेतात करावा असे आवाहन तुळजापूर आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी केली आहे


#आधुनिकशेती #बाजारपेठ #शेतकरी #उस्मानाबाद #तुळजापूर #farmer #agriculture #osmanabad #Tuljapur

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top