अग्निपथ योजने संदर्भाने भावी सैनिकांचे पोलीसांनी केले प्रबोधन
Osmanabad :- सध्या देशात चालू असलेल्या ‘अग्निपथ’ योजनेवरुन देशभरात जाळपोळीच्या घटना घडत असून एकंदरीत त्या संदर्भाने उस्मानाबाद जिल्ह्याची शांतता व सुवय्वस्था अबाधित राखण्याच्या उद्देशाने मा. पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील कळंब येथील ‘साई लक्ष अकॅडमी’ व ‘समर्थ अकॅडमी’, भूम येथील ‘थ्री एस करियर अकॅडमी’ व ‘कर्मवीर करियर अकॅडमी’, परंडा येथील ‘कमांडो करियर अकॅडमी’ व ‘क्रांती करियर अकॅडमी’, उस्मानाबाद येथील ‘दिशा करियर अकॅडमी’, ‘सार्थक करियर अकॅडमी’, ‘श्री करियर अकॅडमी’, उस्मानाबाद (ग्रा.) हद्दीतील वरुडा येथील कमांडो धेय्य करियर अकॅडमी’, नळदुर्ग येथील महालक्ष्मी करियर अकॅडमीस, अशा एकुण 11 सैन्य भरतीपुर्व प्रशिक्षण अकॅडमींना संबंधीत विभागाचे पोलीस उपअधीक्षक व पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारी- अंमलदार यांनी आज दि. 19 जून रोजी भेटी दिल्या.
भेटी दरम्यान पोलीसांनी अकॅडमीतील विद्यर्थी- विद्यार्थीनींना सध्या चालू असलेल्या ‘अग्निपथ’ योजनेसंदर्भात पुर्ण माहिती अवगत न करता कोणत्याही अफवांवर विश्वास ठेउ नये. तसेच कोणतीही अक्षेपार्ह मजकुर प्रसारीत न करता आपले म्हणेने सनदशीर मार्गाने मांडून समाजात शांतता व सुवय्वस्था राखण्यासाठी सहकार्य करावे. त्याचप्रमाणे पोलीसांनी विद्यार्थी- विद्यार्थीनींना सैन्य-पोलीस भरती संदर्भात, वाहतुक नियमाबाबत, आजची तरुणाई व व्यसनाधीनता अशा इत्यादी संदर्भात मोलाचे मार्गदर्शन केले.