उस्मानाबाद जिल्ह्यात मटका व अवैध मद्य विक्री विरोधात कारवाई
अवैध मद्य विरोधी कारवाई.”
अवैध मद्य विरोधी कारवाई दरम्यान उमरगा पोलीसांनी दि. 10 जून रोजी 17.30 वा. सु. दोन ठिकाणी छापे टाकले. यात सुनंदा कांबळे या एकुरगा शिवारात 25 लि. हातभट्टी दारु तर रियाज शेख हे शास्त्रीनगर, उमरगा येथे 10 लि. हातभट्टी दारु बाळगलेले पथकास आढळले. तसेच सुभान वाघमारे हे होर्टी येथील आपल्या घरासमोर 10 लि. हातभट्टी दारु बाळगलेले असताना नळुदर्ग पोलीसांना 10.40 वा. सु. आढळले.
यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायद्यांतर्गत संबंधीत पोलीस ठाण्यात गुन्हे नोंदवले आहेत.
“जुगार विरोधी कारवाई.”
जुगार विरोधी कारवाई दरम्यान आनंदनगर पोलीसांना दि. 10 जून रोजी 15.40 वा. सु. उस्मानाबाद येथील चिरायू ईस्पितळाजवळ आशिष सुरवसे, सुनिल काळे, सोमनाथ चपणे हे तीघे कल्याण मटका जुगार चालवण्याच्या साहित्यासह 35,845 ₹ रक्कम बाळगलेले असताना आढळले. तर मुरुम पोलीसांना 10.30 वा. सु. रामलिंग आंबुसे हे अशोक चौक, मुरुम येथे कल्याण मटका जुगार चालवण्याच्या साहित्यासह 3,340 ₹ रक्कम बाळगलेले असताना आढळले. तसेच ढोकी पोलीसांना विशाल पवार हे ढोकी येथील तेर रस्त्यालगत कल्याण मटका जुगार चालवण्याच्या साहित्यासह 6,280 ₹ रक्कम बाळगलेले असताना आढळले.
यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यांतर्गत संबंधीत पोलीस ठाण्यात गुन्हे नोंदवले आहेत.