१५ वर्षापासून फरार असलेला आरोपी ताब्यात
स्थानिक गुन्हे शाखा : अपघात करुन मृत्युस कारणीभूत ठरलेले लोहारा तालुक्यातील दस्तापूर ग्रामस्थ- वाहिद चाँद पटेल, वय 36 वर्षे हे पोलीसांना मिळुन येत नव्हते. ते वेळोवेळी आपला ठावठिकाणी बदलत असल्याने गेली 15 वर्षापासून ते पोलीसांना मिळुन येत न्वहते. तपासादरम्यान स्था.गु.शा. चे पोनि- श्री. रामेश्वर खनाळ यांच्या मार्गदर्शनाखालील सपोनि- श्री. मनोज निलंगेकर, पोहेकॉ- काझी, कवडे, पोना- पठाण, पोकॉ- ठाकुर, मोरे यांच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे वाहिद पटेल यांस आज दि. 21 जून रोजी सोलापूर शहरातून ताब्यात घेतले असून पुढील कारवाईस्तव नळदुर्ग पोलीसांच्या ताब्यात दिले आहे.