श्रीमंतराजे प्रतिष्ठाणच्या जागतिक योग दिन साजरा

0
श्रीमंतराजे प्रतिष्ठाणच्या जागतिक योग दिन साजरा 

परंडा प्रतिनिधी -
२१ जून हा दिवस संपूर्ण जगात  जागतिक योग दिन म्हणून साजरा करण्यात येतो.जागतिक योग दिन व  स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या निमित्ताने महा एनजीओ  फेडरेशन  महाराष्ट्र राज्य,श्रीमंतराजे प्रतिष्ठाण, कपिलापुरी व क्रांतीसंगर अकॅडमी परंडा यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २१/०६/२०२२ रोजी सकाळी ७ ते ७:४५ या वेळेत परंडा तालुक्यातील क्रांतीसंगर अकॅडमी परंडा येथे तब्बल ६० युवकांच्या उपस्थिती मध्ये जागतिक योग दिन साजरा करण्यात आला. 
दररोज योगा केल्याने तुमच्या शरीरावर सकारात्मक परिणाम होतो. शरीर आणि मन शांत करण्यासाठी योगा खूप फायदेशीर मानला जातो. योग केल्याने तुमच्या शरीराला ऊर्जा मिळते. स्नायूंची ताकद वाढते. तसेच यामुळे तुमची श्वसन, ऊर्जा आणि चैतन्य सुधारते याप्रमुख उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला असे श्रीमंतराजे प्रतिष्ठाणचे अध्यक्ष रणजीत महादेव पाटील यांनी सांगितले.
परंडा येथील योग शिबिर पार पाडण्यासाठी योग शिक्षक दीपक ओव्हाळ,अनिल कांबळे,
पांडुरंग कोकणे,विकास काळे,श्रीमंतराजे प्रतिष्ठाणचे अध्यक्ष रणजीत पाटील,रामेश्वर चोबे
ओम माळी,विजय गुडे, इ. परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top