सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद रेल्वे मार्गासाठी भरीव निधीची तरतूद करा शिवसेनेचे केंद्रीय मंत्री कराड यांना निवेदन

0



सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद रेल्वे मार्गासाठी भरीव निधीची तरतूद करा शिवसेनेचे केंद्रीय मंत्री कराड यांना निवेदन...

सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद रेल्वे मार्गासाठी भरीव निधीची तरतूद करा केंद्रीय मंत्री मा. डॉ. भागवतजी कराड यांना खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांचे निवेदन.

Osmanabad :-

सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद रेल्वेमार्गाचे काम { Work on Solapur-Tuljapur-Osmanabad railway line } सध्या प्रगती पथावर असून या मार्गासाठी भरीव निधीची तरतूद करण्यात यावी अशी मागणी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री ना. डॉ. भागवतजी कराड साहेब यांच्याकडे उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

रेल्वेच्या प्रश्नावर दिलेल्या निवेदनात खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी म्हटले आहे कीमाझ्या लोकसभा मतदारसंघामधील सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद रेल्वेमार्गाचे काम सध्या प्रगतिपथावर आहे. या मार्गासाठी नुकतेच जमीन संपादित होऊन सर्वेक्षणाचे काम पूर्ण झालेले आहे. हा रेल्वेमार्ग नियोजित वेळेत पूर्ण होण्यासाठी भरीव निधीची तरतूद होणे गरजेचे आहे. सन 2022 सालच्या अर्थसंकल्पात रेल्वेमार्गासाठी अत्यंत कमी निधीची तरतूद करण्यात आलेली आहे. या मार्गाकरिता विशेष बाब म्हणून निधीची तरतूद करावीजेणेकरुन रेल्वेमार्गाचे काम पूर्ण होईल. त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांची जमीन संपादित झालेली आहेत्यांना मावेजा वेळेवर मिळू शकेल. त्यामुळे आपल्या स्तरावर सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद रेल्वेमार्गाकरिता निधी उपलब्ध होण्यासाठी योग्य निर्णय घ्यावाअसे निवेदनात म्हटले आहे.

उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या नेतृत्वात शिवसेना उपजिल्हाप्रमुख विजयकुमार सस्तेशहरप्रमुख संजय मुंडेन. प. गटनेते सोमनाथ गुरवबाळासाहेब काकडेसिद्धेश्वर कोळीमाजी शहरप्रमुख प्रवीण कोकाटेपंकज पाटिलअभिजीत देशमुखदिलीप जावळेबंडू आदरकरसुरेश गवळी विजय ढोणे हनुमंत देवकतेमुकेश पाटीलगणेश असलेकरधनंजय इंगळेमनोहर धोंगडेअजय धोंगडेराकेश सूर्यवंशी, सत्यजीत पडवळशिवयोगी चपनेशिवप्रताप कोळीभीमा जाधवमहेश लिमयेयोगेश जाधव व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top