तुळजापूर येथे जुगार विरोधी कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचा छापा

0



तुळजापूर येथे जुगार विरोधी कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचा छापा


Tuljapur : 

स्थानिक गुन्हे शाखा : स्थानिक गुन्हे शाखेचे पथक जिल्हातील अवैध धंदयांविषयी माहिती काढुन कायदेशीर कारवाई करण्यासाठी काल दि.18 जुलै रोजी तुळजापूर उपविभागात गस्तीस होते. दरम्यान पथकास गोपनीय माहिती मिळाली कि, तुळजापूर तालुक्यातील नंदगाव ग्रामस्थ- नागनाथ मल्लीनाथ करंडे यांच्या ताब्यातील गाळ्यात तिरट जुगार चालू आहे. यावर पथकाने नमूद ठिकाणी छापा टाका असता नागनाथ करंडे यांसह गावातील- प्रदिप वाघमारे, सुनिल कट्टे, ईरण्णा शिवगुंडे, सुनिल सुरवसे, महेशकुमार चिनगुंडे हे सर्व लोक तिरट जुगार खेळत खेळत असताना जुगार साहित्यासह 4 मोटारसायकल, 4 भ्रमणध्वनी व रोख रक्कम असा एकुण 2,78,040 ₹ चा माल बाळगलेले आढळले. यावर पथकाने जुगार साहित्यासह मोटारसायकल, भ्रमणध्वनी व रक्कम जप्त करुन त्यांच्याविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 4,5 अंतर्गत नळदुर्ग पो.ठा. येथे गुन्हा नोंदवला आहे.

            सदरची कामगिरी मा.पोलीस अधीक्षक श्री.अतुल कुलकर्णी यांच्या आदेशावरुन स्था.गु.शा. चे प्रभारी पोनि- रामेश्वर खनाळ यांच्या मार्गदर्शनाखालील सपोनि- श्री. मनोज निलंगेकर, पोहेकॉ- अमोल निंबाळकर, जावेद काझी, प्रकाश औताडे, मस्के, पोना- शौकत पठाण, भालचंद्र काकडे, पोकॉ- बलदेव ठाकुर यांच्या पथकाने केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top