उस्मानाबाद नगर परिषद कार्यालयात तिरंगा राष्ट्रध्वज विक्री केंद्राचे उद्घाटन

0

नगर परिषद कार्यालयात तिरंगा राष्ट्रध्वज विक्री केंद्राचे उद्घाटन

प्रत्येक भारतीयाला घरावर तिरंगा फडकवण्याचा बहुमान - मुख्याधिकारी येलगट्टे

भारतीय स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त संपूर्ण देशात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जात आहे. प्रत्येक देशवासियांना  अभिमान वाटावा म्हणून 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट दरम्यान ‘’घरोघरी तिरंगा” या अभियानात प्रत्येकाला तिरंगा ध्वज विकत घेवून  घरावर फडकविण्याचा बहुमान मिळत असल्याचे प्रतिपादन नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक हरिकल्याण येलगट्टे यांनी केले.

उस्मानाबाद येथील नगर परिषद कार्यालयात तिरंगा राष्ट्रध्वज विक्री केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी नगर परिषदेचे कर्मचारी, नागरिक उपस्थित होते.

मुख्याधिकारी येलगट्टे म्हणाले की, ‘घरोघरी तिरंगा झेंडा’ या अभियानासाठी शहरातील नागरिकाना राष्ट्रध्वज उपलब्ध व्हावा. तसेच महिला बचत गटांना झेंडा विक्रीची संधी मिळावी, नागरिक, शालेय विद्यार्थी यांना राष्ट्रध्वज विक्री करण्यासाठी नगर परिषद कार्यालयात  तिरंगा राष्ट्रध्वज विक्री केंद्र सुरू करण्यात आलेले आहे. या केंद्राचा लाभ घेऊन नागरिकांनी राष्ट्रप्रेम जागृत करण्यासाठी घरावर तिरंगा फडकवण्याचे आवाहनही त्यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top