नुकसानग्रस्त येडशी व शेलगाव , सातेफळ , सौदना, गावाची आमदार कैलास पाटील यांच्याकडून पाहणी

0

नुकसानग्रस्त येडशी व शेलगाव , सातेफळ , सौदना, गावाची आमदार कैलास पाटील यांच्याकडून पाहणी

( Osmanabad news )

उस्मानाबाद तालुक्यातील येडशी व कळंब तालुक्यातील शेलगाव, सातेफळ, सौंदना (ढोकी) येथे अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीची उस्मानाबाद कळम मतदारसंघाचे आमदार कैलास पाटील यांनी पाहणी केली. 

पिकांच्या नुकसानी बरोबरच काही ठिकाणी घराचे तसेच नदी-नाल्याकाठच्या शेतातील माती खरडून गेल्याचे निदर्शनास आले. 

नुकसान झालेल्या पिकांचे, खरडून गेलेल्या जमिनीचे पंचनामे करण्याच्या तसेच रस्ता व पुल वाहून गेलेल्या ठिकाणी दुरुस्तीची कामे करण्याच्या संबंधित विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना आमदार कैलास पाटील यांनी सूचना केल्या आहेत

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या व्यथा शासन दरबारी मांडून त्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी आम्ही सर्वोतोपरी प्रयत्न करत आहोत. अशी प्रतिक्रिया यावेळी आमदार कैलास पाटील यांनी दिली आहे

यावेळी उपजिल्हाप्रमुख विजय बापू सस्ते, विभाग प्रमुख विनोद पवार, शेलगाव सरपंच नवनाथ तवले, माजी सरपंच विनोद तवले, बाबासाहेब उगले, सातेफळ सरपंच अजीत वाघमारे, सौंदना सरपंच नेताजी जावळे, वैभव गरड, संतोष उगले, रवी उगले, प्रदिप उगले, दत्ता जगताप, अतुल जगताप, रामलिंग वाघमारे, गणेश पाटील, संजय पाटील, हेमंत शिनगारे, सचिन डोंगरे आदींसह मंडळ अधिकारी, तलाठी, कृषी सहाय्यक शेतकरी बांधव उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top