हर घर तिरंगा उपक्रमांतर्गत पोलीस मुख्यालयात तिरंगा ध्वज विक्री केद्राचे उद्घाटन

0


हर घर तिरंगा उपक्रमांतर्गत पोलीस मुख्यालयात तिरंगा ध्वज विक्री केद्राचे उद्घाटन

 ( Osmanabad news ) 

पोलीस मुख्यालय : आझादीका अमृत महोत्सव ही भारताच्या स्वातंत्रयाच्या 75 व्या वर्धापन दिनानिमीत्त भारत सरकारने आयोजि केलेल्या कार्यक्रमांची मालिका आहे. जन- भागीदारीच्या भावनेतून हा महोत्सव जन उत्सव म्हणून साजरा केला जात आहे. 


याच पार्श्वभुमीतून ‘हर घर तिरंगा’ हा उपक्रम प्रथमत:च राबवला जात असल्याने बाजारात ध्वज कुठे मिळेल याविषयी नागरीकांत संभ्रम आहे. त्याअनुषंगाने शासनपुरस्कृत यंत्रणेंमार्फत विविध ठिकाणी सवलतीच्या दरात ध्वज विक्री केंद्र चालू केली असून त्याचाच एक भाग म्हणून उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष, उस्मानाबाद अंतर्गत पोलीसांसाठी व नागरीकांसाठी पोलीस मुख्यालयात आज दि. 10 ऑगस्ट रोजी मा. पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी यांच्या हस्ते ध्वज विक्री केंद्राचे उद्घाटन केले असून जिल्ह्यातील 18 पोलीस ठाणी स्तरावरही ध्वज विक्रीसाठी उपलब्ध्द करुन दिले जाणार आहेत.


या उद्घाटन प्रसंगी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, उस्मानाबाद च्या प्रकल्प संचालक- मा. प्रांजल शिंदे, पोलीस उपअधीक्षक (गृह), श्री. जयस्वाल, रापोनि- श्री. अरविंद दुबे, सपोनि- श्री. विनोद चौधरी, यशवंत बारवकर यांसह  हे उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top