निष्काळजीपनाचे कृत्य करणाऱ्यांवर गुन्हे दाखल

0

निष्काळजीपनाचे कृत्य करणाऱ्यांवर गुन्हे दाखल.

 

उस्मानाबाद जिल्हा : सार्वजनिक रस्त्यावर रहदारीस धोकादायकरित्या वाहन उभे करणे व सार्वजनिक ठिकाणी हातगाड्यावरील शेगडीत, हॉटेलसमोर निष्काळजीपने अग्नि प्रज्वलीत करणे. अशा प्रकरणी उस्मानाबाद पोलीसांनी काल दि. 07 ऑगस्ट रोजी खालील प्रमाणे कारवाया केल्या.

 

1) इनगोंदा ग्रामस्थ- गणेश रणदिल, वाटेफळ ग्रामस्थ- श्रीकांत भांडवलकर यांनी अंबी पो. ठा. हद्दीत तर मुळज तांडा ग्रामस्थ- विश्वनाथ चव्हाण, कराळी ग्रामस्थ- सत्तार फुलारी, तुरोरी ग्रामस्थ- अर्जुन पवार या सर्वांनी उमरगा पो.ठा. हद्दीत तसेच अलीयाबाद तांडा- प्रकाश राठोड, जळकोट ग्रामस्थ- रहीम शेख, नळदुर्ग ग्रामस्थ- खाँजा शेख, बाबु शेख यांनी नळदुर्ग पो.ठा. हद्दीत आणि केसरजवळगा ग्रामस्थ- श्रीशैल भोज, बेळंब तांडा ग्रामस्थ- अजय राठोड, मुरुम ग्रामस्थ- नौशाद आलम, भागळी ग्रामस्थ- किशोर महामुनी, खेड ग्रामस्थ- अनिकेत गायकवाड यांनी मुरुम पो.ठा. हद्दीत तसेच लोहारा (बु.) ग्रामस्थ- संजय बिरुदे अशा सार्वांनी आपापली वाहने सार्वजनिक रस्त्यावर रहदारीस धोकादायकरित्या उभे करुन भा.दं.सं. कलम- 283 चे उल्लंघन केले.

2) नळदुर्ग येथील- अन्वर शेख यांनी नळदुर्ग येथील अक्कलकोट रस्त्यालगत आपल्या हातगाड्यावर तर करजखेडा येथील- पप्पु कांबळे यांनी गावातील उड्डानपुलाखालील रस्त्यावर आपल्या हातगाड्यावरील शेगडीत निष्काळजीपने अग्नि प्रज्वलीत करुन भा.दं.सं. कलम- 285 चे उल्लंघन केले.

यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तींविरुध्द संबंधीत पोलीस ठाण्यात स्वतंत्र गुन्हे नोंदवले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top