दुकान फोडीतील स्मार्टफोनसह २ आरोपी अटकेत स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
( Osmanabad news )
स्थानिक गुन्हे शाखा : येडशी, ता. उस्मानाबाद येथील मझहर पटेल यांच्या येडशी बस स्थानकासमोरील मोबाईल शॉपीचे शटर अज्ञात व्यक्तीने दि. 31.07.2022 ते दि. 01.08.2022 रोजी दरम्यानच्या रात्री उचकटुन आतील ओप्पो कंपनीचा 1, रियलमी कंपनीचा 1 व विवो कंपनीचे 2 असे एकुण 41,000 ₹ किंमतीचे 4 स्मार्टफोन चोरुन नेले होते. अशा मजकुराच्या मझहर पटेल यांच्या प्रथम खबरेवरुन उस्मानाबाद (ग्रा.) पो.ठा. येथे गुन्हा क्र. 152/2022 हा भा.दं.सं. कलम- 461, 380 अंतर्गत नोदवला आहे.
तपासादरम्यान स्थानिक गुन्हे शाखेचे पथक कळंब उपविभागात गस्तीस असतांना त्यांना गोपनीय खबर मिळाली की, अनिल जांभा काळे उर्फ संतोष, रा. पाथर्डी याच्यासह त्याचा मित्र- महादेव राजेंद्र काळे, रा. आंदोरा हे दोघे अनेक मोबाईल फोन बाळगून आहेत. यावरून पोलीसांनी आज दि. 02 ऑगस्ट रोजी त्या दोघांना ताब्यात घेतले असता त्यांच्या ताब्यात नमूद चोरीच्या 4 स्मार्टफोनसह अन्य 2 स्मार्टफोन आढळल्याने ते स्मार्टफोन जप्त करुन त्यांना अटक करुन पुढील कार्यवाहीस्तव उस्मानाबाद (ग्रा.) पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले आहे. तसेच पोलीस त्याच्या तीसऱ्या साथीदाराचा शोध घेत आहेत.
सदरची कामगीरी मा. पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी व मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. नवनीत काँवत यांच्या मार्गदर्शनाखाली स्थागुशा च्या पोनि- श्री. रामेश्वर खनाळ, सपोनि- श्री. मनोज निलंगेकर, पोहेकॉ- जावेद काझी, प्रकाश औताडे, पोना- शोकत पठाण, होळकर, मस्के यांच्या पथकाने केली आहे.