परंडा शहरात भावीक भक्तांचे आराध्य दैवत असलेल्या भवानी शंकर मंदिराच्या नूतन सभागृहाचा लोकअर्पण सोहळा व महाप्रसादाचे वाटप भाजपा प्रदेश सरचिटणीस विधान परिषदचे माजी आ.सुजितसिंह ठाकूर यांच्या हस्ते सपत्नीक महाआरती करून उत्साहात संपन्न
लोहारा/प्रतिनिधी
परंडा शहरात राजापुरा गल्लीतील असंख्य भावीक भक्तांचे आराध्य दैवत असलेल्या भवानी शंकर मंदिराच्या नूतन सभागृहाचा लोकअर्पण सोहळा व महाप्रसादाचे वाटप दि.25 ऑगस्ट 2022 रोजी भाजपा प्रदेश सरचिटणीस विधान परिषदचे माजी आ. सुजितसिंह ठाकूर यांच्या हस्ते सपत्नीक महाआरती करून मोठ्या उत्साहात संपन्न झाला. अनेक भाविकांचे आराध्य दैवत असणाऱ्या पुरातन भवानी शंकर मंदीरासाठी मा.आ.ठाकूर यांच्या स्थानिक आमदार निधीतून 20 लाख रूपये मंजुर करण्यात आले होते. या निधीमधुन मंदीरात भव्यदिव्य सभागृह बांधण्यात आले असुन या नूतन सभागृहाचा लोकआर्पण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी मंदीरात विधीवत पुजा -अर्चा करून मा.आ.ठाकूर यांच्या हस्ते सपत्नीक आरती करण्यात आली व परिसरातील भाविक भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी मंदीराचे विश्वस्त पं.किशोर महाराज बैरागी यांच्या हस्ते मा.आ.ठाकूर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मा. उपनगराध्यक्ष सुबोधसिंह ठाकूर, जेष्ठ नागरीक सिंधुताई शुक्ला, सरलाताई महाजन, अर्जुनसिंह ठाकूर, जयसिंह ठाकूर, सुनिल शुक्ला, रविंद्र मिश्रा,संतोष मिश्रा, किरणसिंह ठाकूर, गोरख देशमाने, दिपकसिंह ठाकूर, संतोषसिंह करमाळकर, विठोबा मदने, संकेतसिंह ठाकूर व ठाकूर कुटुंबासह परिसरातील भाविक माहिलांसह नागरीक मोठ्या संख्येने उपस्थीत होते.