उस्मानाबाद जिल्हा पोलीस दलाची अमृत महोत्सवी मॅराथॉन उत्साहात पोलीस ,नागरिक,युवक,महिला व मुलांचा उत्स्फूर्त सहभाग

0

 

    


उस्मानाबाद जिल्हा पोलीस दलाची अमृत महोत्सवी मॅराथॉन उत्साहात पोलीस ,नागरिक,युवक,महिला व मुलांचा उत्स्फूर्त सहभाग

 

उस्मानाबाद.दि,14(जिमाका) स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव 2022  निमित्त प्रत्येक शासकीयनिमशासकीय कार्यालयशाळा आणि कॉलेज मध्ये स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्साहात साजरा होत आहे. त्यासाठी जनजागृतीपर विविध कार्यक्रम घेतले जात आहेत. याच पार्श्वभुमीवर अमृत महोत्सवाच्या अनुषंगाने हर घर तिरंगा’ या उपक्रमाच्या प्रसिध्दी व जाणीव जागृतीसाठी शहरामध्ये तुळजाभवानी स्टेडीयम येथे उस्मानाबाद जिल्हा पोलीस दलातर्फे आज जिल्हास्तरीय अमृत महोत्सवी मॅराथॉन’ च्या 10 कि.मी. दौडेचे आयोजन करण्यात आले होते.या मॅराथॉनमध्ये पोलीस दलातील अधिकारी-कर्मचारी, नागरिक, विद्यार्थी,तरुण, महिला आणि मुलांनी उत्सफूर्त सहभाग नोंदविला.

          यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ताअपर पोलीस अधीक्षक नवनीत काँवतकळंब येथील सहायक पोलीस अधीक्षक एम. रमेश या सर्वांच्या हस्ते झेंडा दाखवून या मॅराथॉनची सुरुवात करण्यात आली. या मॅराथॉनचा मार्ग तुळजाभवानी स्टेडीयम- डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक- छत्रपती शिवाजी महाराज चौक- पोलीस अधीक्षक कार्यालय- मध्यवर्ती प्रशासकीय इमारत- ज्ञानेश्वर मंदीर- तेरणा कॉलेज समोरील चौक येथून परत त्याच मार्गे तुळजाभवानी स्टेडीयम असा होता. या मॅराथॉनचा समारोप स्टेडियम येथे झला.

या अमृत महोत्सवी मॅराथॉनमध्ये उस्मानाबादच्या पोलीस दलातील पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदार यांसह शहरातील नागरिविद्यार्थी, महिला तसेच स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या तरुण-तरुणींनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला. या दौडेत पोलीस दलातील पुरुष गटात- पो.अं.- सचिन दराडे प्रथम, पोउपनि- रामहरी चाटे यांच्या द्वितीय, पो.अं.- रामराव इंगळे यांनी तृतीय क्रमांक पटकावला तर महिला पोलीस गटात-पोउपनि- अनघा गोडगे यांनी प्रथम पो.अं.- गिता चौपाडे यांना द्वितीय आणि कल्पना करणवाड यांनी तृतीय क्रमांक पटकावला.

 नागरिकांच्या पुरुष गटात रोहीत घरबुडवे यांनी प्रथम, अनिकेत पवार यांनी द्वितीय आणि अर्जुन शिंदे यांनी तृतीय क्रमांक पटकावला. तर महिला गटात किर्ती कांबळे यांनी प्रथम, सपना जाधव यांनी द्वितीय आणि पल्लवी लंगडे यांनी तृतीय क्रमांक पटकावला. तर बाल गटात- ऋषिकेश गंगावणे यांनी प्रथम, साईनाथ माने यांनी द्वितीय आणि समर्थ माने यांनी तृतीय क्रमांक पटकावला. विजेत्यांना पोलीस अधीक्षक श्री. कुलकर्णी यांच्या हस्ते सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देन गौरविण्यात आले.  अमृत महोत्सवी मॅराथॉनची सांगता  राष्ट्रगीत गायनाने करण्यात आली.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top