ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीर
उस्मानाबाद,दि.22(जिमाका): राज्यातील ज्येष्ठ नागरिकांच्या तपासणी करण्यासाठी या क्षेत्रात काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थाच्या सहाय्याने दि.17 सप्टेंबर 2022 ते 2 ऑक्टोंबर 2022 या कालावधीत प्रत्येक शिबीराचे आयोजन करण्यात येणार आहे.त्या अनुषंगाने उस्मानाबाद शहरात ज्येष्ठ नागरीकांची आरोग्य तपासणी शिबीर,डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे दि.26 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी 11.00 ते दुपारी 01.00 पर्यंत आणि कळंब तालुक्यातील शिबीर विरंगुळा येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळया जवळ नगर पालिका गार्डन बार्शी रोड या ठिकाणी दि.29 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी 11.00 ते दुपारी 01.00 पर्यंत अयोजित केली जाणार आहे.
वरील वेळापत्रकान्वये ज्येष्ठ नागरीकाचे आरोग्य तपासणी शिबीर आयोजित केलेल आहे.या शिबीरात मोफत आरोग्य तपासणी व मोफत औषधे वाटप करण्यात येणार आहेत.
तरी उस्मानाबाद जिल्हयातील जास्तीत जास्त ज्येष्ठ नागरीकानी याचा लाभ घ्यावा,असे आवाहन येथील समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त बी.जी.अरवत यांनी केले आहे.