उस्मानाबाद जिल्हा स्त्री रुग्णालयात राष्ट्रीय पोषण माह साजरा

0


जिल्हा स्त्री रुग्णालयात राष्ट्रीय पोषण माह साजरा

  उस्मानाबाद,दि.15(जिमाका):- येथील जिल्हा स्त्री रुग्णालय येथे राष्ट्रीय पोषण माह 2022 निमित्त कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. येथील शासकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ.राठोड, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.धनंजय पाटील, अतिरिक्त शल्य चिकित्सक डॉ लाकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली येथील जिल्हा स्त्री रुग्णालयात राष्ट्रीय पोषण माहचे आयोजन नुकतेच आयोजन करण्यात आले होते.


             या वेळी मान्यवरांच्या हस्ते पोषण विषयक माहिती प्रदर्शन तसेच ॲनिमिया विषयक साहित्य वाटप करण्यात आले. गरोदर मातेस आहाराचे महत्त्व सांगून फळाची परडी  वाटप करण्यात आले. पोषण आहार व आरोग्य शिक्षण प्रदान करणे, टीकाकरण, स्वास्थ्य संबंधी तपासणी व संदर्भ  सेवा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. अनेक प्रकारच्या खाण्याच्या वस्तू या अंतर्गत लाभार्थ्यांना  देण्यात येतात. ज्यामुळे त्यांचा शारीरिक विकास अजून चांगल्या प्रकारे होऊ शकेल. या अभियानामुळे माता व बालकांचे आरोग्य अधिक सुरक्षित आणि आरोग्यदायी असल्याचे डॉ. स्मिता गवळी यांनी सांगितले.

            शासकीय नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थिनींनी पथनाट्य सादर करण्यात आले. यासाठी  प्राचार्य गरड, श्रीमती पोखरकर, श्रीमती सिरीन शेख, श्रीमती मुळे यांनी  मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष पोतदार, प्रास्ताविक प्रीती रुपनार तर आभार प्रदर्शन श्रीमती  दौंडे  यांनी केले.  


             यावेळी स्त्री रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ.स्मिता गवळी, वैद्यकीय अधिकारी डॉ. सूर्यवंशी, डॉ.आयेशा, आहारतज्ञ प्रीती रूपनार, दोंडे, सवई, अधिसेविका मराठे, श्रीमती जाधव, श्रीमती भालेराव, श्रीमती सोनवणे तसेच या कार्यक्रमास वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, परिचारिका, विद्यार्थी, माता, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*****

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top