राहत अर्बन क्रेडिट को-ऑप. सोसायटी लि. उस्मानाबाद सर्वसामान्यांना आर्थिक बळ देणारी राहत सोसायटी: सजियोद्यीन शेख
उस्मानाबाद : आज दिनांक 25/09/2022 रोजी राहत अर्बन क्रेडिट को-ऑप. सोसायटीची 14 वी वार्षीक सर्वसाधरण सभा संपन्न् झाली.
या सभेला प्रमुखपाहुणे म्हणून सहकार प्रशिक्षण बोर्डचे श्री. जाधव साहेब, उलेमा ए हिंद चे जिल्हाध्यक्ष श्री. मौलाना अहेमद साहेब, तहसीलदार श्री. मुस्तफा खोंदे साहेब, ऑडिटर श्री. अरूण कांबळे साहेब, अंधश्रध्दा निर्मुलन समीतीचे जिल्हाध्यक्ष श्री.अजय वाघाळे साहेब, हे उपस्थित होते.
सभेच्या अध्यक्षस्थांनी सोसायटीचे चेअरमन श्री. सजीयोद्दीन शेख होते. यावेळी श्री.जाधव साहेबांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. यावेळी वर्ष 2021-2022 चे अहवाल वाचन सोसायटीचे सचिव श्री. रियाज शेख साहेब यांनी केले.
अध्यक्षीय भाषणात श्री. सजीयोद्दीन शेख यांनी स्वा. अशरफोद्दीन शेख साहेब यांच्या आठवणींना उजाळा दिला.
सोसायटी ना लाभ ना तोटा या तत्वावर सर्वसामान्यांना आर्थिक बळ देण्याचे कार्य मागील 14 वर्षापासुन सातत्याने करत आहे. सर्वसामान्यांना बिनव्याजी कर्ज सहज उपलब्ध करून सावकारां मार्फत होत असलेल्या आर्थीक पिळवणूकीपासुन सर्वसामान्यांना राहत (समाधान) मिळणे हा सोसायटीचा मुख्यं उदेश् असल्याचेमत अध्यक्षांनी सांगीतले.
यावेळी उपस्थित प्रमुख पाहुण्यांचा सत्कार, उत्कृष्ठ़ कर्मचा-यांचा सत्कार, आदर्श सभासदांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्र संचालन व आभार प्रदर्शन श्री. सिकंदर पटेल यांनी केले.

