उस्मानाबाद जिल्हा काँग्रेस ओबीसी कमिटी विभागाच्या जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय निवडी
उस्मानाबाद येथे जिल्हा काँग्रेस भवन येथे राजेशजी राख मराठवाडा ओबीसी विभाग,महाराष्ट्र राष्ट्रीय कोओडिनेटर,काँग्रेस माजी जिल्हाध्यक्ष विश्वास शिंदे, काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत पाटील,काँग्रेस ओबीसी कमिटी जिल्हाध्यक्ष धनंजय राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली आज काँग्रेस भवन येथे जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय काँग्रेस ओबीसी कमिटी विभागाची निवडी करण्यात आल्या यामध्ये ओबीसी काँग्रेस कमिटी उस्मानाबाद जिल्हा कार्याध्यक्षपदी बिलाल कुरेशी तर जिल्हा उपाध्यक्षपदी प्रभाकर डोंबाळे व राजुदास आडे यांची निवड करण्यात आली तसेच काँग्रेस ओबीसी कमिटी उस्मानाबाद तालुकाध्यक्षपदी अश्रुबा माळी व कळंब तालुका अध्यक्षपदी दुधाळ यांची निवड करण्यात आली
यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस ओबीसी उपाध्यक्ष पांडुरंग कुंभार, जिल्हा मुख्य संघटक राजाभाऊ शेरखाने उस्मानाबाद काँग्रेस शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे, नगरसेवक सिद्धार्थ बनसोडे यांनी निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांचे जिल्हा काँग्रेस कमिटी व जिल्हा काँग्रेस ओबीसी कमिटी यांच्यावतीने सत्कार करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या
तसेच दिनांक 8 ऑक्टोंबर रोजी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसी विभाग व मराठवाडा विभाग यांच्या वतीने बीड येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले व बीडच्या राज्यसभा खासदार श्रीमती रजनीताई पाटील व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस ओबीसी कमिटी अध्यक्ष भानुदास माळी यांच्या नेतृत्वात भव्य ओबीसी मेळावा आयोजित करण्यात आला आहे या मेळाव्यास उस्मानाबाद जिल्ह्यातील ओबीसी नी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन काँग्रेस ओबीसी कमिटी जिल्हाध्यक्ष धनंजय राऊत यांनी यावेळी काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांना केली आहे