शिवराज्याभिषेक सोहळा रिक्षा समितीच्या अध्यक्षपदी रमेश यादव, उपाध्यक्षपदी सत्यविजय मोहिती तर सचिवपदी ईश्वर काळे
उस्मानाबाद, दि.25 सप्टेंबर-
शिवराज्याभिषेक सोहळा समिती, उस्मानाबाद संचलित शिवराज्याभिषेक रिक्षा समितीची दि.25 सप्टेंबर रोजी स्थापना करण्यात आली. शासकीय विश्रामगृह, उस्मानाबाद येथे झालेल्या बैठकीत शिवराज्याभिषेक रिक्षा समितीच्या नुतन कार्यकारणीची निवड समितीचे अध्यक्ष शशिकांत खुने यांनी जाहीर केली.
यामध्ये शिवराज्याभिषेक रिक्षा समितीच्या नुतन अध्यक्षपदी रमेश यादव यांची निवड करण्यात आली. उपाध्यक्षपदी सत्यविजय मोहिते यांची तर सचिवपदी ईश्वर काळे यांची निवड जाहिर करण्यात आली. उर्वरित कार्यकारणी पुढिल प्रमाणे कार्याध्यक्ष राजकुमार ढोबळे, सहकार्याध्यक्ष योगेश आतकरे, उपकार्याध्यक्ष राहुल वाघमारे, संघटक अनिल सुर्यवंशी, सहसंघटक अनिल कदम, उपसंघटक अजय जाधव, कोषाध्यक्ष विशाल भोसले, सहकोषाध्यक्ष नितीन मुंडे, उपकोषाध्यक्ष नवेश खैरे, प्रवक्ता महेश सलगर, सहप्रवक्ता अविनाश साळुंके, उपप्रवक्ता तानाजी माने, प्रसिध्दी प्रमुख कलिम शेख, प्रसिध्दी सहप्रमुख विशाल राठोड, प्रसिध्दी उपप्रमुख विपीन वीर, सोशल मिडीया प्रमुख अभिजीत कांबळे, सोशल मिडीया सह प्रमुख राम शेंडगे, सोशल मिडीया उपप्रमुख सुनिल पवार यांची निवड करण्यात आली.
यावेळी छत्रपती शिवाजीमहाराज चौक येथे हालग्यांच्या दणदणाटात, फटाक्यांची आतषबाजी करून गुलालाची उधळण करीत महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून जल्लोष साजरा करण्यात आला. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. जिजाऊ चौक, बार्शी नाका येथे वाद्यांच्या व फटाक्यांच्या तालावर कार्यकर्ते यांनी आनंद व्यक्त केला.
यावेळी शिवराज्याभिषेक सोहळा समितीचे अध्यक्ष शशिकांत खुने, उपाध्यक्ष धर्मराज सुर्यवंशी, सचिव दत्तात्रय साळुंके, कार्याध्यक्ष रवी मुंडे, संघटक अच्युत थोरात, संघटक अमोल पवार, गुंडोपंत जोशी, बुबासाहेब उंबरे, संतोष घोरपडे, जयराज खोचरे, डॉ. शतानंद दहिटणकर, अॅड. प्रशांत जगदाळे, सुदर्शन बुकन, गणेश पवार, मनोज शेलार, बाळासाहेब कुंभार, मालोजी सुर्यवंशी, ओमकार शितोळे, धनंजय साळुंके, रियाज शेख मोहम्मद पठाण, आयुब कादरी, आकाश भालेकर व इतर शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.