google.com, pub-1406548548385211, DIRECT, f08c47fec0942fa0 आई तुळजाभवानी दिनदर्शिका-२०२३ चे प्रकाशन

आई तुळजाभवानी दिनदर्शिका-२०२३ चे प्रकाशन

0


आई तुळजाभवानी दिनदर्शिका-२०२३ चे प्रकाशन देवी मंदिरात जिल्हाधिकारी श्री.कौस्तुभ दिवेगावकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार राणाजगजितसिंह पाटील साहेब तसेच पोलीस अधीक्षक श्री.अतुल कुलकर्णी यांची विशेष उपस्थिती होती.

घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर आई तुळजाभवानी मातेचे ९ विविध रूपातील आकर्षक फोटो आणि मंत्रांसोबत सृजनात्मक पद्धतीने ही दिनदर्शिका तयार केली आहे. 

नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने सदरील दिनदर्शिका देशातील राजकीय, सामाजिक, औद्योगिक क्षेत्रातील नामवंतांना सस्नेह भेट म्हणून पोहोचविण्यात येणार आहे. 

आई तुळजाभवानीचा आशीर्वाद आणि महिमा देशभरात पसरावा अशी आमची यामागची भूमिका आहे. असा प्रयत्न करण्याचे हे पहिलेच वर्ष आहे. पुढच्या वर्षी दिनदर्शिकेच्या माध्यमातून आई तुळजाभवानीची अधिकाधिक माहिती देण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. असे सौ. अर्चनाताई पाटील यांनी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top