google.com, pub-1406548548385211, DIRECT, f08c47fec0942fa0 सामाजिक न्याय विभागाचा स्थापना दिवस उत्साहात साजरा करावा-डॉ. प्रशांत नारनवरे

सामाजिक न्याय विभागाचा स्थापना दिवस उत्साहात साजरा करावा-डॉ. प्रशांत नारनवरे

0

सामाजिक न्याय विभागाचा स्थापना दिवस उत्साहात साजरा करावा-डॉ. प्रशांत नारनवरे

 

उस्मानाबाद,दि.14(जिमाका) महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाची स्थापना होऊन तब्बल 90 वर्ष पूर्ण होत आहेत.  90 वर्षापूर्वी दि.15 ऑक्टोबर 1932 रोजी समाज कल्याण विभागाची स्थापना मुंबई येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रयत्नातून झालेली आहे.  त्यामुळे हा दिवस शासन स्तरावर मोठया प्रमाणात उत्साहात साजरा करावा अशा सूचना समाज कल्याण विभागाचे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी सर्व विभागांना दिल्या आहेत.


या निमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, उस्मानाबाद येथे दिनांक 15 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी 10.30 वा. विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून मान्यवरांची व्याख्याने व लाभार्थ्यांना प्रत्यक्ष लाभाचे वाटप करण्यांत येणार असल्यामुळे  या कार्यक्रमास जास्तीत जास्त नागरीकांनी उपस्थित रहावे असे आवाहन आयोजक समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त बाबासाहेब अरवत,  व जि.प.चे जिल्हा समाज कल्याण अधिकारी नागनाथ चौगुले  यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top