google.com, pub-1406548548385211, DIRECT, f08c47fec0942fa0 तुळजापूर येथे चोरीच्या मोबाईल फोनसह आरोपी ताब्यात , स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

तुळजापूर येथे चोरीच्या मोबाईल फोनसह आरोपी ताब्यात , स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

0



चोरीच्या मोबाईल फोनसह आरोपी ताब्यात 

 

स्थानिक गुन्हे शाखा :  Tuljapur : तुळजापूर येथील- माउली सुधाकर चोपदार, वय 30 वर्षे यांच्या घरासमोरील यात्रेकरी थांबण्याच्या खोलीतील शोकेशवर ठेवलेला त्यांचा अंदाजे 7,000 ₹ किंमतीचा ओपो मोबाईल फोन दि. 02.10.2022 रोजी 14.00 ते 14.30 वा. दरम्यान अज्ञात व्यक्तीने चोरुन नेला होता. यावर माउली चोपदार यांनी तुळजापूर पोलीस ठाणे गाठून भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा क्र. 359/2022 हा नोंदवला आहे.

            तपासादरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मिळालेल्या गोपनीय माहितीच्या व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे उस्मानाबाद तालुक्यातील धारुर ग्रामस्थ- पांडुरग महादेव कदम, वय 52 वर्षे यांस आज दि. 06.10.2022 रोजी धारुर परिसरातून ताब्यात घेउन त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याजवळ नमूद चोरीतील ओपो मोबाईल फोन आढळल्याने पथकाने तो हस्तगत करुन पुढील कारवाईस्तव पांडुरंग कदम यांस चोरीच्या मोबाईल फोनसह तुळजापूर पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले आहे.

सदरची कामगीरी मा. पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी यांच्या आदेशावरुन स्थागुशा च्या पोनि- श्री. यशवंत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि- श्री. मनोज निलंगेकर, पोलीस अंमलदार- जावेद काझी, प्रकाश औताडे, शौकत पठाण, मस्के यांच्या पथकाने केली आहे.  

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top