google.com, pub-1406548548385211, DIRECT, f08c47fec0942fa0 तुळजापूर आश्विनी पौर्णिमा यात्रेनिमित्त विविध मार्गावर वाहतूक केंद्रांची स्थापना

तुळजापूर आश्विनी पौर्णिमा यात्रेनिमित्त विविध मार्गावर वाहतूक केंद्रांची स्थापना

0
तुळजापूर आश्विनी पौर्णिमा यात्रेनिमित्त विविध मार्गावर वाहतूक केंद्रांची स्थापना 

उस्मानाबाद,दि.06(जिमाका):- तुळजापूर आश्विनी पौर्णिमा-2022 यात्रा दि.09 ते 11 ऑक्टोबर 2022 या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होते. या यात्रा कालावधीमध्ये महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून भाविकांच्या सोयीसाठी मोठ्या प्रमाणात रा.प.बसेस उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. या बसेसच्या वाहतूकीसाठी पुढीलप्रमाणे केंद्रावरून विविध मार्गावर वेगवेगळी वाहतूक केंद्र उभारण्यात आली आहेत. 


                 बार्शी आणि उस्मानाबाद मार्गावरील वाहतूकीसाठी तुळजापूर अग्निशमन केंद्रावर शंभर बसेस, सोलापूर मार्गावरील वाहतूकीसाठी तुळजापूर सैनिकी विद्यालय केंद्रावर एक हजार 50 बसेस, कर्नाटक राज्यातील हुमनाबाद आणि गुलबर्गा मार्गावरील वाहतूकीसाठी तुळजापूर नवीन बसस्थानकावर शंभर बसेस आणि लातूर मार्गावरील वाहतूक तसेच ग्रामीण भागातील वाहतूकीसाठी तुळजापूर येथील नवीन बसस्थानकावर शंभर बसेसची सोय करण्यात आली आहे.

             तरी तुळजापूर येथे आश्विनी पौर्णिमेसाठी येणाऱ्या भाविकांनी या सोयीचा लाभ घ्यावा, असे आवाहन रा.प.विभाग नियंत्रक यांनी केले आहे.
*****

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top