माहेराहुन पैसे आणण्यासाठी तगादा लावल्याने छळास कंटाळून महिलेची आत्महत्या!
हुंडाबळी
Osmanabad : वाशी पोलीस ठाणे : श्रीमती सविता अरुण भराटे, वय 22 वर्षे, रा. पारा, ता. वाशी यांनी दि. 05.10.2022 रोजी 13.45 वा. पुर्वी पारा येथील शेत विहीरीतील पाण्यात उडी टाकून आत्महत्या केली. त्यांचे पती- अरुण, सासु- भागीरथी व सासरे- अंकुश वल्लभदास भराटे यांनी सन- 2020 पासून सविताकडे माहेराहुन 50,000 ₹ आणण्यासाठी तगादा लाउन त्यांचा शारिरीक व मानसिक छळ केल्याने या छळास कंटाळून सविता यांनी आत्महत्या केली आहे.
अशा मजकुराच्या सविताचे पिता- संदिपान पंढरीनाथ जाधव, वय 67 वर्षे, रा. विडा, ता. केज, जि. बीड यांनी आज दि. 06.10.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 304 (ब), 306, 498 (अ), 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.


