आळणी येथील कृषी महाविद्यालय आंतर महाविद्यालयीन कबड्डी स्पर्धा संपन्न
कृषी महाविद्यालय खरपुडीचा संघ विजेता तर एमजीएम औरंगाबाद उपविजेता
उस्मानाबाद -वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी संलग्नित कृषी महाविद्यालय आळणी गडपाटी आयोजित आंतर महाविद्यालयीन कबड्डी स्पर्धा 2022-23 चे उद्घाटन मोठ्या थाटात आणि प्रचंड जल्लोषात संपन्न झाले. यावेळी उद्घाटक म्हणून कळंबचे पोलीस उपअधिक्षक एम.रमेश यांच्या हस्ते झाले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ.प्रतापसिंह पाटील हे होते.तर वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणीचे विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ.सचिन मोरे,जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.तर सारिका काळे,रणवीर पंडित,बी.एफ.राठोड,अभिमन्यू काशीद, चेतन जाधव, महादेव साठे, बबनराव लोकरे, सत्यवान सोन्ने,युवराज राजे,युवराज निंबाळकर,सरपंच प्रमोद वीर,ब्रह्मनाथ मेंगडे, डॉ.राम आवारे,महेश ढेपे,अड.योगेश सोन्ने- पाटील,जयंत देशमुख,अविनाश गायकवाड, बाळासाहेब मांगले यांची, प्रमुख उपस्थिती होती. पाच व सहा नोव्हेंबर या दोन दिवसीय आंतर महाविद्यालयीन कबड्डी स्पर्धेचे आयोजन कृषी महाविद्यालय आयोजन केले आहे.यामध्ये एकूण 22 संघांनी सहभाग नोंदविला. यामध्ये अंतिम लढत ही कृषी महाविद्यालय खरपुडी व एम.जी.एम. कॉलेज औरंगाबाद यांच्यामध्ये झाली.यात मोठ्या फरकाने कृषी महाविद्यालय खरपुडी यांनी एमजीएम महाविद्यालयावर मात करत विजेतेपद पटकावले.
बक्षीस वितरण समारंभ देखील रात्री उशिरा पार पडला.या बक्षीस वितरण समारंभास ही धनेश्वरी शिक्षण समूहाचे अध्यक्ष डॉ.प्रतापसिंह पाटील, काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत पाटील,काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे नेते समर्थ सिटीचे शेखर घोडके यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी पंच म्हणून फुलचंद कदम, मोहन पाटील, अमरनाथ राऊत, सुबराव कांबळे, संग्राम मोहिते,रमेश मोहिते,श्याम जाधवर, यांनी काम पाहिले तर तांत्रिक समिती प्रमुख म्हणून लक्ष्मण मोहिते व साजेद चाऊस यांनी काम केले.
या स्पर्धेचे सूत्रसंचालन श्री बंडे यांनी केले तर आभार प्रा.हरी घाडगे यांनी मानले.या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी कृषी महाविद्यालय गडपाटी आळणी उस्मानाबाद येथील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्गांनी परिश्रम घेतले.