संविधान जनजागरण रॅलीस शहरवासीयांचा मोठ्या प्रमाणात उत्सुर्फ प्रतिसाद..
ठिकठिकाणी रॅलीचे भव्य स्वागत
उस्मानाबाद :- भारतीय संविधान दिनानिमित्त मतदार जनजागरण समिती उस्मानाबाद व संविधान जनजागरण समिती उस्मानाबादच्या वतीने संविधान जनजागरण रॅली काढण्यात आली होती या रॅलीस शहरवासीयांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला,शाळा कॉलेजचे विद्यार्थी यांचा लक्षणीय सहभाग होता.रॅलीच्या मार्गावर ठिकठिकाणी संस्था, संघटना,पक्ष पार्टी,वैयक्तिक आपापल्या परीने स्वागत करण्यात आले,मान्यवरांचे स्वागत अब्दुल लतिफ,गणेश वाघमारे,संजय गजधने,सचीन चौधरी,बाबा गुळीग,यांच्या हस्ते करण्यात आले.बार्शी नाका जिजाऊ चौक येथुन सामुदायिक संविधान उद्देशिकाचे वाचन करुन अॅडिशनल कलेक्टर श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून रॅलीस सुरुवात केली,प्रथमता डाॅ.स्मिताताई शहापुरकर,अर्चनाताई अंबुरे,विजय गायकवाड, यांनी संविधानिक मनोगत व्यक्त केले,मतदार जनजागरण समिती, संविधान जनजागरण समिती,पर्यटन विकास समिती,अंधश्रद्धा निर्मूलन समिती,रिपब्लिकन पार्टी ओबिसी सेल,रिपब्लिकन सेना,बिएस एन एल कर्मचारी संघटना,अखिल भारतीय जिवा संघटना,तांबरी विभाग रहिवासी यांच्या वतीने संविधान दिन राष्ट्रीय सण उत्सव म्हणुन साजरा करण्यात यावा अशी मागणी निवेदनाद्वारे उपस्थित अॅडिशनल श्रीकांत शिंदे यांना करण्यात आली.तुळजापुरचे आमदार राणा दादा पाटील यांनी रॅलीत सहभाग नोंदवुन शुभेच्छा दिल्या,सोबत नितीन काळे, सुधिर पाटील,राजसिंह निंबाळकर,इंद्रजीत देवकते,अभय इंगळे सहभागी झाले.अहेमदिया जमात,आर्य समाज मंदिर चौक येथे अखिल भारतीय जिवा संघटनेचे नामदेव वाघमारे,अंबाला हॉटेल रस्ता येथे तांबरी विभागातील रहिवासी,त्रिशरण चौक येथे बहुजन विकास समिती, शासकीय रुग्णालय समोर राजाभाऊ ओव्हाळ,विद्यानंद बनसोडे,रणजीत गायकवाड,अजय कांबळे, आरपीआय (आठवले)सर्व कार्यकर्ते,काळा मारुती मंदिर चौक येथे सचिन चौधरी,एपीजे अब्दुल कलाम चौक येथे बहुजन हिताय बहुजन सुखाय,छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या जवळ वाहतूक संघटना,महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने रॅलीचे स्वागत करण्यात आले.फुले शाहु आंबेडकर उद्यान कृती समितीच्या नियोजीत जागेत रॅली तील नागरिक, विद्यार्थ्यांना आणि सर्वच उपस्थित शहरवासीयांना पाणी,फळे वाटप करण्यात आले.रॅलीत आकर्षक असा संविधान उद्देशिका प्रतीचा सुंदर रथाचा देखावा माजी नगर सेवक राणा बनसोडे यांनी सादर केला होता.तर आम्ही भारताचे लोक हे गीत लावण्यात आले होते, ठिकठिकाणी समाज कल्याण विभागाच्या वतीने रांगोळी काढली होती,नगर परिषद यांनी स्वच्छता केली होती.हलगीच्या वाद्यात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.छत्रपती शिवाजी महाराज व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अर्चनाताई अंबुरे,किरणताई निंबाळकर आशाताईं कांबळे,कविताताई काळे,ज्योतीताई बडे,महिला भगिनींच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले.रॅलीत सहभाग राणा बनसोडे,किसन घरबुडवे, अंकुश उबाळे,सोपान खिल्लारे,अॅड.बशारत अहेमद,दादासाहेब जेटीथोर,अंकुश पेठे,देवानंद एडके,श्रीकांत मटकिवाले,आनंद भालेराव,राजेंद्र धावारे सर, रविंद्र शिंदे,सिजोद्दिन शेख,सिध्देश्वर बेलुरे,पोपट लांडगे,संपतराव शिंदे,प्रशांत शिंदे,प्रशांत बनसोडे, संतोष मोरे,मुकेश शिंदे,सुधाकर माळाळे,फेरोज पल्ला,गजानन पाटील,राहुल राऊत, महादेव एडके,स्वराज जानराव अन्य इतर विद्यार्थी महिला भगिनी बांधव उपस्थित होते.रॅलीत 26/11 शहिद विरांना अभिवादन करण्यात आले.कार्यक्रमाची सुत्रसंचलन अजय वागळे यांनी केले तर प्रस्तावना अब्दुल लतिफ यांनी केली. आभार गणेश वाघमारे यांनी सहभागी नागरिक,पत्रकार बांधव,पोलीस प्रशासन, समाज कल्याण विभाग नगरपरिषद विभाग,जिल्हा प्रशासन यांचे मानले.रॅलीची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.