शिवा संघटनेचा सर्व ओबीसी,बहुजन,दुर्लक्षित घटकांना, शेतक-यांना, कष्टक-यांना सोबत घेऊन नवीन पक्ष स्थापन करण्याचा प्राथमिक निर्णय
शिवा संघटनेने आदरणीय प्रा मनोहरजी धोंडे सर यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रातील इतर सर्व ओबीसी, बहुजन, दुर्लक्षित घटकांना, शेतक-यांना कष्टक-यांना सोबत घेऊन पक्ष स्थापन करावा अशी मागणी व भावना मागील अनेक वर्षांपासून अनेकांची होती, वेळोवेळी कार्यकर्ते पदाधिकारी यांच्या याबाबत प्रा मनोहरजी धोंडे सर यांचेकडे भावना व्यक्त केल्या जात होत्या, 2014 ला नांदेड येथे शिवा संघटनेची पदाधिकारी परीषद घेण्यात आली या परिषदेला 1700 पदाधिकारी उपस्थित होते, 1700 पैकी 1450 पदाधिकारी यांनी लेखी लिहून दिले होते की नवीन पक्ष स्थापन करावा व 230 पदाधिकारी यांनी शिवसेना भाजप बरोबर जाण्यासाठी लेखी फाॅम भरून दिले होते. असंख्य पदाधिकारी कार्यकर्ते यांची भावना नवीन पक्ष स्थापन करण्याची असतांनाही आठ वर्ष त्यावर विचार मंथन झाले कारण शिवा संघटना जेव्हा एखादा निर्णय घेते तेव्हा कदापी मागे हटत नाही. त्यामुळे आजवर पक्ष स्थापनेचा निर्णय घेतला गेला नव्हता.
परंतु श्रीक्षेत्र कपिलधार येथे शिवा संघटनेच्या 27 व्या राज्यव्यापी मेळावा संपन्न झाल्यानंतर आम्ही काही कार्यकर्त्यांनी शिवा संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय प्रा मनोहरजी धोंडे सर यांची कपिलधार येथील हाॅटेल कन्हैय्या वर जाऊन भेट घेऊन पक्ष स्थापने संदर्भात महाराष्ट्रातील पदाधिकारी कार्यकर्ते यांची एक online मिटिंग घेण्यासाठी वेळ मागीतला सुरूवातीला सर नाही बोलले परंतु तुम्ही वेळ देणार नाही तोवर आम्ही इथुन जाणार नाही अशी कार्यकर्त्यांनी भुमिका घेतल्याने 20 नोव्हेंबर 2022ची तारीख मिळाली. त्यांनंतर एका कार्यकर्त्याने दुसऱ्याला दुसऱ्याने तिसऱ्याला संपर्क करून त्यांच्या शिवा संघटनेने इतर सर्वच समाजांना सोबत घेऊन नवीन पक्ष स्थापने संदर्भात असलेल्या भावना जाणून घेतल्या, त्यात सर्वच स्तरातुन पक्ष स्थापन करावा अशा हजारो समाज बांधवांच्या प्रतिक्रिया आल्या.
त्याच संदर्भात दि.20 नोव्हेंबर 2022 रोजी झालेल्या online मिटिंगला 500 पदाधिकारी उपस्थित होते व ठिक ठिकाणी असंख्य समाज बांधवांनी मोठी स्किन लावुन एकत्रीत पणे या online बैठकीत सहभाग घेतला, या online मिटिंगमध्ये सहभाग घेलेल्या अनेकांनी पक्ष स्थापन करावा अशी आग्रही भुमिका घेऊन आम्ही सर्वोतोपरी त्यासाठी समर्पित राहुन पक्ष वाढीचे काम करू अश्या आपल्या बोलक्या प्रतिक्रिया दिल्या तर उर्वरित सहभागी सर्व हजारो समाज बांधवांनी मॅसेज टाकुन पक्ष स्थापन करणे गरजेचे आहे पक्ष स्थापनेचा निर्णय सरा़नी घ्यावा अशा मॅसेज द्वारे प्रतिक्रिया दिल्या व पक्ष स्थापनेची आजच घोषणा करावी तोवर हि online मिटिंग सुरूच ठेवणार अशी एकमुखी भुमिका घेतली आणि पक्ष स्थापने साठी आदरणीय प्रा मनोहरजी धोंडे सर यांच्या कडे आग्रही भूमिका लावुन धरली, असंख्य पदाधिकारी कार्यकर्ते यांचा प्रचंड उत्साह व मोठ्या प्रमाणात आग्रही मागणी पाहुण सध्या इच्छा नसतांनाही कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर करत शिवा संघटना नवीन पक्ष स्थापन करणार असल्याचा प्राथमिक निर्णय आ.प्रा.मनोहरजी धोंडे सरांनी घेतला. आदरणीय प्रा मनोहरजी धोंडे सरांनी घोषणा करताच online मिटिंग मध्येच कार्यकर्ते पदाधिकारी यांचा उत्साह वाढल्याने घोषणांचा आवाज निनांदला, त्यांनंतर पक्ष स्थापनेच्या सर्व प्रक्रियेत सर्वच समाज बांधवांनी ओबीसी/बहुजन/ शेतकरी/कष्टकरी/ दुर्लक्षित समाज बा़धवांना सामावुन सहभागी करून सर्वांच्या भावना प्रतिक्रिया जाणून पक्ष स्थापनेची पुढील प्रक्रिया सुरू करणार असल्याचे आदरणीय प्रा मनोहरजी धोंडे सर यांनी आपल्या समारोपिय भाषणात सांगितले.
येणाऱ्या काही दिसात एक सर्वांनसाठी खुली online conference आयोजित करण्यात येणार असुन त्यानंतर इतर सर्व राजकीय पक्षात असलेल्या व त्याच बरोबर सर्व पक्षांनी उपेक्षित ठेवलेल्या कार्यकर्ते नेत्यांची online conference घेऊण त्यांचीही मते जाणून घेतली जाणार आहे.
व त्यानंतर सर्व प्रक्रिया पुर्ण करून येत्या 28 जानेवारी 2023 रोजी अधिकृत घोषणा केली जाणार आहे.