संत गुरूनानकांचा जातीवाद व भेदभाव निर्मुलनाचा मुलमंत्र सर्वांनी अंगीकारावा - आरोग्यमंत्री सावंत

0
संत गुरूनानकांचा जातीवाद व भेदभाव निर्मुलनाचा मुलमंत्र सर्वांनी अंगीकारावा - आरोग्यमंत्री सावंत


गुरूनानक फाऊंडेशनच्या रूग्णालयाचे लोकार्पण 


पुणे(प्रतिनिधी) 
        ईश्वर एक आहे , संपूर्ण चराचरात त्याचे वास्तव्य असून करता करविता तोच आहे. त्यामुळे आपण प्रत्येकांशी प्रेमपूर्वक भावनेने वागले पाहिजे असा संदेश देणारे शीख धर्माचे संस्थापक व शिख धर्माचे पहिले धर्मगुरू गुरुनानक यांनी संपूर्ण विश्वाला एकतेचा संदेश दिला आहे असे प्रतिपादन राज्याचे आरोग्य मंत्री प्रा.डॉ. तानाजी सावंत यांनी केले. 
पुणे येथील गुरूनानक दरबार येथे संतश्रेष्ठ गुरूनानक यांच्या जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. 

यावेळी बिहार विधानसभेचे सभापती  देवेश चंद्रा ठाकूर, गुरूद्वारा विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष चरणजीत सिंग सहानी, विश्वस्त मंडळाचे सचिव बलविंदर सिंग ओबेरॉय,उपाध्यक्ष अमरजित सिंग घाई, धर्मदाय उपायुक्त सुधिर बुक्के यांची प्रमुख उपस्थिती होती. 

    यावेळी पुढे बोलताना मंत्री सावंत म्हणाले की, आपले संपूर्ण जीवन त्यांनी जातीवाद व भेदभाव निर्मुलन करण्यासाठी व्यतीत केले.जात-पात, उच्च-नीच व अंधविश्वासाला संपविण्यासाठी सर्वजण एकत्र बसून जेवण करू शकतील त्यासाठी लंगर परंपरा सुरु करून समाजाला एकत्र आणलं. समाजासाठी त्यांनी केलेलं काम अलौकिक असून त्यांचा एकतेचा संदेश व त्यांचे विचार संपूर्ण विश्वासाठी प्रेरणादायी आहेत असे सांगितले. 

   प्रारंभी गुरूनानक दरबार येथे जाऊन प्रकाश पर्व या कार्यक्रमला त्यांनी उपस्थितीत लावली.  गुरुनानक मेडिकल फाउंडेशनच्या वतीने आरोग्यसेवेसाठी उभारण्यात आलेल्या रुग्णालयाचे लोकार्पण यावेळी आरोग्‍यमंत्री सावंत यांच्या हस्ते संपन्न झाले.

    गुरूनानक दरबारच्या विश्वस्त मंडळाच्या वतीने आरोग्यमंत्री सावंत, सभापती देवेश ठाकूर यांचा प्रथेनुसार सत्कार करण्यात आला. 
या कार्यक्रमास शीख बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top