अवैध मद्य विरोधी विशेष मोहिमेदरम्यान उस्मानाबाद जिल्हा भरात १७ छापे
उस्मानाबाद : मा. पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी व मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. नवनीत काँवत यांच्या आदेशावरुन काल रविवार दि. 18.12.2022 रोजी अवैध मद्य विरोधी विशेष मोहिम राबवण्यात आली. या मोहिमेदरम्यान 17 कारवाया करण्यात आल्या. या छाप्यात घटनास्थळावर आढळलेला गावठी दारु निर्मीतीचा सुमारे 600 लि. अंबवलेला द्रव पदार्थ हा नाशवंत असल्याने तो जागीच ओतून नष्ट करण्यात आला तर सुमारे 525 लि. गावठी दारु व देशी- विदेशी दारुच्या एकुण 235 सिलबंद बाटल्या असे मद्य जप्त केले. ओतून दिलेला मद्यार्क निर्मीतीचा द्रवपदार्थासह मद्यनिर्मीती साहित्य व जप्त मद्य यांची एकत्रीत किंमत अंदाजे 1,07,815 ₹ आहे. यावरुन महाराष्ट्र मद्य मनाई कायद्यांतर्गत संबंधीत पोलीस ठाण्यात 17 गुन्हे खालीलप्रमाणे नोंदवण्यात आले आहेत.
1) स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने 7 ठिकाणी छापे टाकले. यात उस्मानाबाद (ग्रा.) पो.ठा. हद्दीत गावसुद ग्रामस्थ- संगीता काळे व छायाबाई पवार या दोघी गावातील आपापल्या घरासमोर एकुण 95 लि. गावठी दारु बाळगलेल्या आढळल्या. मुरुम पो.ठा. हद्दीत यशवंतनगर, मुरुम येथील- विजय शिर्के हे आपल्या गल्लीत 40 लि. गावठी दारु बाळगलेले, तर नाईकनगर तांडा येथील- माणिक आडे हे सुंदरवाडी शिवारात 70 लि. गावठी दारु बाळगलेले आढळले. नळदुर्ग पो.ठा. हद्दीत पाटीलवाडा, ता. तुळजापूर येथील- लखण चव्हाण व शंकर राठोड हे दोघे गावातील आपापल्या घरासमोर गावठी दारु निर्मीतीचा गुळ- पाणी मिश्रीत अंबवलेला सुमारे एकुण 400 लि. द्रव पदार्थ व 70 लि. गावठी दारु बाळगलेले आढळले. उमरगा पो.ठा. हद्दीत फुले नगर येथील- सतिश शहरवाले हे आपल्या रहात्या कॉलनीत 80 लि. गावठी दारु बाळगलेले आढळले.
2) मुरुम पो.ठा. च्या पथकाने 2 ठिकाणी छापे टाकले. यात सालेगाव येथील- महेश कानकधर हे कालदेव निंबाळा गावात जि.प. शाळा परिसरात देशी- विदेशी दारुच्या 118 सिलबंद बाटल्या बाळगलेले, तर आलुर येथील- रामलिंग मासडे हे गावातील मुरुम रस्त्यालगतच्या समृध्दी हॉटेलमध्ये विदेशी दारुच्या 10 सिलबंद बाटल्या बाळगलेले आढळले.
3) शिराढोन पो.ठा. च्या पथकाने 2 ठिकाणी छापे टाकले. यात खामसवाडी येथील- नितीन शेळके व रोहन सुरवसे हे दोघे गाव शिवारात वेगवेगळ्या दोन ठिकाणी एकुण देशी- विदेशी दारुच्या 30 सिलबंद बाटल्या बाळगलेले आढळले.
4) ढोकी पो.ठा. च्या पथकाने 3 ठिकाणी छापे टाकले. यात राजेशनगर, ढोकी येथील- बाबासाहेब चव्हाण हे ढोकी पेट्रोल पंप चौकात 60 लि. गावठी दारु बाळगलेले, तर वानेवाडी येथील- दत्त ओव्हळ व डकवाडी येथील- दत्त अदमाने हे दोघे तेर येथील वेगवेगळ्या दोन ढाब्यासमोर अनुक्रमे देशी- विदेशी दारुच्या 27 सिलबंद बाटल्या व 90 लि. गावठी दारु बाळगलेले आढळले.
5) उस्मानाबाद (ग्रा.) पो.ठा. च्या पथकाने अंबेजवळगा येथे छापा टाकला. यात ग्रामस्थ- तानाजी रसाळ हे गावातील आपल्या घरासमोर 10 लि. गावठी दारु बाळगलेले आढळले.
6) भुम पो.ठा. च्या पथकाने वारेवडगाव येथे छापा टाकला. यावेळी ग्रामस्थ- दादा काळे हे गावातील आपल्या घरासमोर गावठी दारु निर्मीतीचा गुळ- पाणी मिश्रीत अंबवलेला सुमारे एकुण 200 लि. द्रव पदार्थ व देशी दारुच्या 50 सिलबंद बाटल्या बाळगलेले आढळले.
7) उमरगा पो.ठा. च्या पथकाने उमरगा शहरात छापा टाकला. यावेळी पतंगे रोड येथील- हुसन चौधरी हे उमरगा येथील त्रिकोळी रस्त्यालगत एका शेडसमोर 10 लि. गावठी दारु बाळगलेले आढळले.