औरंगाबाद विभाग शिक्षक मतदार संघ निवडणूक कार्यक्रम जाहीर

0
औरंगाबाद विभाग शिक्षक मतदार संघ निवडणूक कार्यक्रम जाहीर


उस्मानाबाद, दि.29 (जिमाका): भारत निवडणूक आयोगाचे पत्रान्वये दि. 29 डिसेंबर 2022 पासून औरंगाबाद विभाग शिक्षक मतदार संघ निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला असून निवडणूक आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. निवडणूक कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे.

             गुरुवार, दि. 5 जानेवारी 2023 रोजी निवडणूक अधिसूचना जारी करण्यात येणार आहे. गुरुवार, दि. 12 जानेवारी 2023 रोजी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस. शुक्रवार दि. 13 जानेवारी 2023 रोजी अर्जाची छाननी. सोमवार, दि. 16 जानेवारी 2023 रोजी अर्ज माघार घेण्याचा अंतिम दिवस. सोमवार, दि. 30 जानेवारी 2023 रोजी मतदान प्रक्रिया सकाळी 8:00 ते दुपारी 4:00 पर्यंत होणार आहे. गुरुवार, दि. 2 फेब्रुवारी 2023 रोजी मतमोजणी केली जाणार आहे.
          *****

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top