टिक टॉक सुपरस्टार संतोष मुंडे चा दुर्दैवी मृत्यू! Tik Tok Superstar
बीड जिल्ह्यातील भोगलवाडी (ता.धारूर) येथील एका सामान्य शेतकरी कुटुंबातील टिक टॉक वरून प्रसिद्धीस आलेला संतोष मुंडे व त्याच्या सोबतच्या आणखी एका तरुणाचा विजेच्या ट्रान्सफॉर्मर वरील फ्यूज जोडताना अचानक वीज प्रवाह सुरू होऊन अपघात घडल्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याचे दुःखद वृत्त समजले. एका गरीब शेतकरी कुटुंबातील संतोषने ग्रामीण भाषा, सहज विनोद व देहबोलीचा कलात्मक वापर करून प्रसिद्धी मिळवली होती.
शेतकऱ्यांच्या पोरांना ग्रामीण भागातील विजेचा लपंडाव आणि अपुऱ्या सुविधा यामुळे सतत बरीच अशी कामे पर्याय नसल्याने आपला जीव धोक्यात घालून स्वतः करावी लागतात. या दुर्दैवी अपघाताची जबाबदारी महावितरणने घ्यावी, या अपघातात नेमकी कुणाची चूक, हे समोर आले पाहिजे. संतोष व अपघाती मृत्यू झालेल्या अन्य तरुणाच्या कुटुंबास महावितरणने तात्काळ आर्थिक मदत द्यावी.अशी मागणी परडी आमदार धनंजय मुंडे यांनी केली आहे
दोघांनाही भावपूर्ण श्रद्धांजली दिली आहे.