क्लीन समता ग्रीन समता परिवारातर्फे शिवजयंती उत्सहात साजरी

0

क्लीन समता ग्रीन समता परिवारातर्फे शिवजयंती उत्सहात साजरी

उस्मानाबाद : सर्वांचे आराध्य दैवत लोककल्याणकारी राजा छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती शहरातील क्लीन समता ग्रीन समता परिवारातर्फे मोठ्या जल्लोषात साजरी करण्यात आली. आठरा पगड जातींच्या लोकांना एकत्र घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केले त्याचाच आदर्श घेऊन १९ फेब्रुवारी रोजी 
क्लीन समता ग्रीन समता परिवाराने समता नगर परिसरातील सर्व जातीधर्माच्या नागरिकांनी एकत्र घेत सामाजिक एकोपा जपत आज शिवजयंती साजरी केली. 
आजच्या या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगराध्यक्ष मकरंद नंदुभैय्या राजेनिंबाळकर तसेच समतानगर मधील लहान मुले,महिला तसेच ज्येष्ठ नागरिकांची लक्षणीय उपस्थिती होते.

 कार्यक्रमात समता नगरमधील कु.फरहान खान पठाण या लहान बालकाने शिवाजी महाराजांवर केलेल्या भाषणाने सर्वांचा उर भरून आला .आज ३५० वर्षानंतरही छत्रपती शिवाजी महाराजांवर येथील जनता आपला जीव ओवाळून टाकते याची प्रचिती आजचा शिवजयंतीचा कार्यक्रम बघून आली.

कार्यक्रमाच्या शेवटी क्लीन समता ग्रीन समता परिवाराचे संस्थापक श्री.नाना घाटगे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
 
जय जिजाऊ, जय शिवरायांच्या घोषणाणी परिससर फुलला होता.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top