कृषि विभाग,जिल्हा परिषद यांचे मार्फत विविध वैयक्तिक योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

0

कृषि विभाग,जिल्हा परिषद यांचे मार्फत विविध वैयक्तिक योजनेसाठी अर्ज  करण्याचे आवाहन

 

उस्मानाबाद,दि.22 (जिमाका):- कडबाकुटी- सदर योजनेअंतर्गत 10 हजार रुपये अनुदान देण्यात येणार आहे.पाणबुडी मोटर संच 10 हजार रुपये अनुदान देण्यात येणार आहे एच डी पी ई पाईप संच 10 हजार रुपये अनुदान देण्यात येणार आहे.बायागॅस संयंत्र-सदर योजनेअंतर्गत प्रती सयंत्र 22 हजार 850 रुपये अनुदान देण्यात येणार आहे.व्हर्मी कंपोस्ट बेड-प्रती बेड 1 हजार 500 रुपये अनुदान देण्यात येणार आहे.ताडपत्री 2 हजार 100 प्रती ताडपत्री 2100/- रुपये अनुदान देण्यात येणार आहे.

या योजनेसाठी पंचायत समिती कृषि विभाग स्तरावर अर्ज घेणे सुरु आहे. सदर योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी पंचायत समिती कृषि अधिकारी व विस्तार अधिकारी कृषि यांचेकडे अर्ज सादर करावेत.

बायोगॅस सयंत्र उभा करुन कार्यन्वित केल्यावर अनुदान देण्यात येईल.या योजनेची अधिक माहिती घेण्यासाठी आपल्या तालुक्याच्या पंचायत समितीतील कृषी अधिकारी व विस्तार अधिकारी कृषि यांच्याशी संपर्क साधावा. ज्या लाभार्थ्यांचे अर्ज प्रथम प्राप्त होतील त्यांना प्राधान्य देण्यात येईल.सर्व तालुक्यांना प्रवर्गनिहाय लक्षांक वितरीत करण्यात आलेला आहे.अर्ज सादर करताना कागदपत्रे.सातबारा/8अ,बँक पासबुक,आधार कार्ड,विहित नमुन्यातील अर्ज,जी.एस.टी.खरेदी बिल,कडबा कुटटी साठी जनावरे असलेला दाखला,बायोर्गस साठी जनावरे असलेला दाखला.जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, विलास जाधव यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top