अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड यांचा उस्मानाबाद जिल्हा दौरा
उस्मानाबाद,दि.07(जिमाका):- राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड हे उद्या दि.8 फेब्रुवारी 2023 रोजी उस्मानाबाद जिल्हयाच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.
बुधवार दि.8 फेब्रुवारी 2023 रोजी दुपारी 01.00 वाजता शासकीय वाहनाने सोलापूर येथून तुळजापूर येथे आगमन सोईनुसार श्री.संदीप राठोड, मुळेगाव तांडा याच्या घरी सदिच्छा भेट दुपारी 02.00 वाजता तुळजापूर येथे आगमन बंजारा समाज सहविचार सभेस उपस्थिती स्थळ:- BK. Fangsan हॉल,अक्कलकोट रोड,नळदुर्ग तुळजापूर दुपारी 03.00 वाजता शासकीय वाहनाने तुळजापूर येथून लातूरकडे प्रयाण.