सीना कोळेगाव, निम्न तेरणा या मोठ्या प्रकल्पाच्या उन्हाळी कालवा सल्लागार समितीची बैठक संपन्न
मुंबई :- मंत्रालय मुंबई येथे महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री तथा उस्मानाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री मा.प्रा.डॉ.तानाजीराव सावंत यांचे अध्यक्षतेखाली सीना कोळेगाव, निम्न तेरणा या मोठ्या प्रकल्पाच्या उन्हाळी कालवा सल्लागार समितीची बैठक संपन्न झाली. सदर बैठकीस व्हीसीद्वारे मा. खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार अभिमन्यू पवार, आमदार संजय मामा पाटील उपस्थित होते. अभिजीत म्हेत्रे, अधीक्षक अभियंता तथा सदस्य सचिव कालवा सल्लागार समिती यांनी बैठकीत दोन्ही प्रकल्पाच्या रब्बी व उन्हाळी हंगामातील सिंचन तथा बिगर सिंचन करिता पाण्याचे नियोजन तथा सिंचन आवर्तन बाबतची माहिती अध्यक्ष व इतर सदस्यांना अवगत केली.
निम्न तेरणा प्रकल्पातून Tail to head पाणी सोडण्याचे नियोजन करण्याबाबत तसेच तेरणा उपसा सिंचन योजना तात्काळ कार्यान्वित करण्याबाबत व प्रकल्प पूर्णत्वासाठी बार चार्ट तयार करण्याच्या सूचना मा. अध्यक्ष यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
अध्यक्षांनी सीना कोळेगाव प्रकल्पाचे गाळ सर्वेक्षण करण्याचे निर्देश दिले तसेच प्रकल्पातील पाण्याचे नियोजन व सिंचन व्यवस्थापन हे शेतकऱ्यांच्या मागणी तथा आवश्यकतेनुसार करण्याचे निर्देश दिले. निम्न तेरणा प्रकल्प कालवा सल्लागार समितीचे सहअध्यक्ष मा. गिरिशजी महाजन यांनी पाण्याचे काटेकोर नियोजन करण्यासाठी सूचित केले.
सदर बैठकीस भारत शिंगाडे अधीक्षक अभियंता उस्मानाबाद, चिस्ती अधीक्षक अभियंता BIPC, RDC शिवकुमार स्वामी, कार्यकारी अभियंता रोहित जगताप, सलीम आवटे, संजय जेवळीकर तसेच महसूल व इतर शासकीय विभागाचे अधिकारी उपस्थित होते.