सोलापूरचे पै.राम शेळके यांनी अंतिम कुस्ती जिंकुन श्री "बसवेश्वर केसरी" होण्याचा मान मिळवला

0
सोलापूरचे पै.राम शेळके यांनी अंतिम कुस्ती जिंकुन श्री "बसवेश्वर केसरी" होण्याचा मान मिळवला

लोहारा/प्रतिनिधी
लोहारा तालुक्यातील जेवळी येथील ग्रामदैवत श्री महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या जयंती निमित्त आयोजित सहा दिवसीय यात्रा महोत्सवाची सांगता कुस्तीच्या दंगलीने झाली. अंतिम कुस्ती सोलापूरच्या पैलवान राम शेळके यांनी जिंकत श्री "बसवेश्वर केसरी" होण्याचा मान मिळवला. बसव जयंती निमित्त जेवळी येथे 19 एप्रिल ते 24 एप्रिल दरम्यान सहा दिवसीय यात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. दिवसभर आणि रात्री चालणाऱ्या या यात्रा महोत्सवात उन्हाची तिव्रता असतानाही भाविकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. रविवारी रात्री दहा वाजता नंदीकोलसह पालखीची छबिना मिरवणूक निघाली. नंदीकोलची विद्युत रोषणाई करून सजावट करण्यात आली होती. या मिरवणुकीत हलते देखावे, विविध प्रकारच्या नकला,सर्व भाविकांचे लक्ष वेधून घेत होते रात्री दोन वाजता श्री बसवेश्वर हायस्कूल च्या मैदानावर शोभेचे दारूकाम झाले. शोभेच्या दारूच्या आतिषबाजी भाविक मंत्रमुग्ध झाले होते. सोमवारी भाविकांच्या मनोरंजनासाठी भारूड, जादुचे प्रयोग असे विविध कार्यक्रम ठेवले होते. दुपारी चार वाजता कुस्तीचे फड भरला होता. या कुस्ती फडाचे उद्घाटन आ.ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी युवा नेते किरण गायकवाड, कुस्तीचे मार्गदर्शक मारुती खोबरे, पै.प्रा धनराज भुजबळ यांची प्रमुख उपस्थिती होते. येथील कुस्ती आखाड्यात कुस्ती खेळण्यासाठी राज्यातील विविध भागातून मोठ्या प्रमाणावर पैलवान आले होते. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत विद्युत प्रकाश झोतात कुस्ती खेळविण्यात आले. एकवीस हजार रूपयांची अंतिम कुस्ती पै.राम शेळके सोलापूर विरुद्ध अनिकेत गोरे बीड यांच्यात झाली. यात राम शेळकेनी यांनी अनिकेतला आस्मान दाखवत श्री बसवेश्वर केसरी होण्याचा मान मिळविला. दुसरी अकरा हजार रुपयांची कुस्ती पवन भुजबळ वाडी वडगांव विरुद्ध गणेश धायकुडे भुसणी यांच्यात झाला यात पवन भुजबळ यांनी बाजी मारली. दहा हजार रुपयांची तिसरी कुस्ती जीवन भुजबळ वाडी वडगांव व विनय मोटे बामणेवाडी यांच्यात झाली यात जीवन भुजबळ यांनी विजय मिळवला. सात हजार रुपयांची चौथी कुस्ती आकाश भोसले होर्टी व विष्णु ताकपुरे लातूर यांच्यात बरोबरीत निघाली. या कुस्ती स्पर्धेत अनेक लहान मोठ्या कुस्ती यावेळी खेळविणयात आले. या संपूर्ण कुस्तीचे सूत्रसंचालन पै.गोविंद घारगे यांनी केले. यावेळी पंच म्हणून रूस्तूम ए हिंद अँकडमिचे संचालक पै.धनराज भुजबळ, दादा थोटे टाकळी, पै.रामेश्वर कार्ले, पै.व्यकंट भुजबळ, पै.ब्रम्हानंद कार्ले, पै.अरूण हावळे यांनी काम पाहिले. कुस्तीच्या आखाड्यात श्री बसवेश्वर केसरीचा मान पटकावलेले पै.राम शेळके यांना सेनानिवृत्त मुख्याध्यापक बी.एम.बिरादार यांच्या हस्ते चांदीचा गदा आणि रोख पारितोषिक देवून सत्कार करण्यात आला. यावेळी उपसरपंच बसवराज कारभारी डॉ संगमेश्वर बिरादार यांची प्रमुख उपस्थिती होती. भाविकांच्या मनोरंजनासाठी कोल्हापूरचे कशीश या आँर्केस्टाचे सोमवारी रात्री आयोजन करण्यात आले होते. याचे उद्घाटन सामाजिक कार्यकर्ते कल्याणी ढोबळे यांच्या हस्ते करण्यात आले. तीन दिवस राज्यस्तरीय नृत्य स्पर्धेतील दिलखेचक आणि ठसकेबाज लावणी, तीन दिवस धार्मिक कार्यक्रम झाल्यानंतर वनस् मोर च्या गजरात भाविक होसे नवसेच्या उपस्थितीत शांततेत यात्रेची सांगता सोहळा करण्यात आली. यात्रा यशस्वी करण्यासाठी यात्रा कमिटीचे अध्यक्ष बसवराज कारभारी सचिव मल्लिनाथ डिग्गे, गुंडाप्पा कारभारी, महादेव मोघे, शिवशरण कारभारी, बाळासाहेब कटारे, जगदीश हावळे, महादेव सारणे, सुभाष सारणे, नागेश ढोबळे, यांनी परिश्रम घेतले. 
-------------------------------------
राजकीय विरोधक यात्रेत एकत्र
लोहारा तालुक्यातील सर्वाधिक लोकसंख्या आणि मतदार असलेल्या जेवळी गावावर सर्वच राजकीय पक्षाचे लक्ष केंद्रित असते. पक्षीय राजकारण वेगळे आणि गावपातळीवरील राजकारण वेगळे असल्याचे चित्र गेल्या वीस वर्षापासून दिसत आहे. मात्र अनेक दिवस एकाच पँनल आणि एकाच पक्षात राहून काम केलेले मुरूम बाजार समितीचे उपसभापती, चेअरमन बसवराज कारभारी आणि दोन टर्म उपसरपंच असलेले मल्लिनाथ डिग्गे यांनी डिसेंबर महिन्यात झालेल्या निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात पँनल काढून निवडणूक लढवली होती. शेवटच्या टप्यात निवडणूक प्रतिष्ठेची झाली होती त्यामुळे सर्वाचे लक्ष येथील निवडणुकीत होते. राजकीय वातावरण एवढे गरम झाले होते की दोन्ही नेते लवकर एकत्रितपणे येतील असे वाटत नव्हते. परंतु गावच्या यात्रेनिमित्त एकत्रित आल्याने अनेकांनी समाधान व्यक्त केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top