राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगराध्यक्षा, उपाध्यक्ष यांच्यासह शेकडोंचा शिवसेनेत प्रवेश , राष्ट्रवादी काँग्रेसला पडले मोठे भगदाड

0

राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगराध्यक्षा, उपाध्यक्ष यांच्यासह शेकडोंचा शिवसेनेत प्रवेश , राष्ट्रवादी काँग्रेसला पडले मोठे भगदाड

उस्मानाबाद दि.३ (प्रतिनिधी) - कळंबच्या माजी नगराध्यक्षा, माजी उपनगराध्यक्ष, माजी शहराध्यक्ष यांच्यासह इतर शेकडोजणांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या उपस्थितीत मुंबई येथे शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे. त्यामुळे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसला मोठे भगदाड पडले असून पक्षाला जबर धक्का बसला आहे.  

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शिवसेनेत  अनेकजण जाहीर प्रवेश करीत आहेत. या पक्ष प्रवेशामुळे कळंब येथील शिवसेनेची ताकद वाढली असून येत्या नगर परिषद निवडणुकीत शिवसेनेला मोठा फायदा होणार असल्याचे दिसून येत आहे. प्रवेश करणाऱ्यांमध्ये माजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष संजय मुंदडा, माजी नगराध्यक्ष सुवर्णा मुंडे, माजी नगराध्यक्ष आशा सुधीर भवर यांच्यासह अमर विजय गायकवाड, सुभाष सुर्यभान पवार, इंदुमती जयनंदन हौसलमल, साधना कांतीलाल बागरेचा, संगीता महेश पुरी, सफुरा शकील काझी (सर्व माजी उपनगरअध्यक्ष) लक्ष्मण मनोहर कापसे, मुख्तार बागवान, निलेश शिवराज होनराव, मुरलीधर भवर, महेश मिठू पुरी, उत्तरेश्वर बळीराम चोंदे, कांतीलाल मोहनलाल बागरेचा सागर सुभाष मुंडे व पदाधिकारी व शेकडो कार्यकर्त्यांनी प्रवेश केला. या सर्वांचे शिवसेनेत मुख्यमंत्री शिंदे व पालकमंत्री सावंत यांनी स्वागत करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top