महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार प्रमाणीकरण करुन घ्यावे : सुनिल शिरापूरकर

0
महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार प्रमाणीकरण करुन घ्यावे : सुनिल शिरापूरकर

 
 उस्मानाबाद,दि.03( प्रतिनिधी ):- महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत अल्पमुदत पीक कर्जाची नियमितपणे परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्याच्या योजनेची अंमलबजावणी सुरु करण्यात आली आहे.





               जिल्ह्यात आजअखेर 48 हजार 548 लाभार्थी शेतकऱ्यांची यादी योजनेच्या पोर्टलवर प्रसिध्द करण्यात आली आहे. योजनेचा लाभ मिळण्याकरिता शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण करणे अनिवार्य आहे. आधार प्रमाणीकरण केल्यानंतर लाभाची रक्कम शेतकऱ्यांच्या बचत खात्यावर वर्ग करण्यात येत आहे. आजअखेर 44 हजार 687 शेतकरी लाभार्थ्यांची आधार प्रमाणीकरण केलेले असून 39 हजार 88 शेतकऱ्यांच्या बचत खात्यावर 115 कोटी 72 लाख रुपये  जमा झालेले आहेत. 3 हजार 861 लाभार्थी शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण कलेले नाही. शासनाने त्यांच्या ई-मेलद्वारे कळविले आहे की, दि.15 एप्रिल 2023 पर्यंत लाभार्थी शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण करुन घ्यावे. त्यानंतर आधार प्रमाणीकरण करण्याचे पोर्टल बंद होणार आहे.






               तसेच जिल्हास्तरीय कमिटीकडे 83 आणि तालुकास्तरीय कमिटीकडे 54 शेतकऱ्यांनी ऑनलाईन तक्रारी दिलेल्या आहेत. तेंव्हा शेतकऱ्यांनी तात्काळ जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, त्यांच्या तालुक्याचे तहसीलदार आणि सहाय्यक निबंधक सहकारी संस्था यांना भेटून तक्रारींचे निराकरण करावे.



             तरी सर्व लाभार्थी शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांनी महा-ई सेवा केंद्र, सी.एस.सी.सेंटर किंवा बँक शाखेत जावून आपले आधार प्रमाणीकरण करुन घ्यावे आणि योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे आणि जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांनी केले आहे.
*****

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top