उस्मानाबाद, कळंब बाजार समितीच्या निवडणुकीत बाळासाहेबांची शिवसेना स्वबळावर मैदानात

0

उस्मानाबाद, कळंब बाजार समितीच्या निवडणुकीत बाळासाहेबांची शिवसेना स्वबळावर मैदानात


उस्मानाबाद - उस्मानाबाद आणि कळंब कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळाच्या निवडणुकीत बाळासाहेबांची शिवसेना स्वबळावर मैदानात उतरली असून दोन्ही ठिकाणी स्वतंत्र पॅनल उभारून लढणार असल्याचे जिल्हाप्रमुख सुरज साळुंके यांनी सांगितले. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा.डॉ.तानाजीराव सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली या निवडणुकीत बाजार समितीची सत्ता खेचून आणणार असल्याचेही ते म्हणाले.

दोन्ही बाजार समिती निवडणुकीत सर्व 18 जागांसाठी उमेदवारांचे नामनिर्देशनपत्र निवडणूक निर्णय अधिकार्‍यांकडे सोमवारी दाखल करण्यात आले. उस्मानाबाद येथे उमेदवारी अर्ज दाखल करताना जिल्हाप्रमुख सुरज साळुंके, यांचे सह उमेदवार पदाधिकारी व कार्यकर्ते  उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top