महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्यांचा उस्मानाबाद जिल्हा दौरा
उस्मानाबाद,दि,05(जिमाका):- महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा.डॉ.गोविंद काळे व प्रा.डॉ.निलिमा सरप (लाकडे) हे महाराष्ट्र राज्य मागासवर्गआयोगाच्या कामकाजा करिता दि. 6 ते 7 जून 2023 या कालावधीमध्ये उस्मानाबाद येथे विविध जातींच्या संदर्भात क्षेत्र पाहणी करण्याकरिता येत आहेत.त्यांचा दौऱ्याचा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे.
मंगळवार दि.6 जून 2023 रोजी सायंकाळी 07.00 वा.उस्मानाबाद येथे आगमन व शासकीय विश्रामगृह येथे मुक्काम बुधवार दि.07 जून 2023 रोजी सकाळी 10 ते 10.30 वा.सहायक आयुक्त समाजकल्याण यांचा इतर मागास बहूजन कल्याण योजनाचा आढावा व सदस्य, सचिव जिल्हा जात पडताळणी समिती उस्मानाबाद याच्या समवेत चर्चा सकाळी 10.30 वा. वाशी तालुक्यातील इंदापूर कडे रवाना सकाळी 11.30 ते 12.30 इंदापूर येथील तांबटगर (कलाईगर) या जात समूहाच्या प्रतिनिधीशी चर्चा व क्षेत्र पाहणी, सकाळी 12.30 वाशी कडे प्रयाण. दुपारी 1.00 ते दुपारी 1.30 वाशी येथील तांबटगर (कलईगर) या जात समुहाच्या प्रतिनिधीशी चर्चा व क्षेत्रपाहणी दुपारी 1.30 वा. कळंब कडे रवाना. दुपारी 2.30 ते 3.30 कळंब येथील तांबटगर (कलईगर) या जात समूहाच्या प्रतिनिधीशी चर्चा व क्षेत्रपाहणी. दुपारी 3.30 वा. तुळजापूर कडे रवाना. सायंकाळी 4.30 ते 5.30 श्री. तुळजाभवानी मंदिर संस्थानअंतर्गत अभियांत्रिकी महाविद्यालय व सैनिकी विद्यालयामधील शिक्षक व शिक्षकेतर रिक्त पदाचा आढावा. सायंकाळी 6.00 पुणेकडे रवाना.